घोषणा जोरदार, पण वास्तवातही उतराव्यात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 08:09 IST
रेल्वे प्रवास सुखकर व्हावा एवढेच मत तरुणाईने व्यक्त केले.
घोषणा जोरदार, पण वास्तवातही उतराव्यात!
- रेल्वे अर्थसंकल्पावर तरुणाईच्या प्रतिक्रिया फेब्रुवारी महिना हा देशाच्या आगामी वर्षभराचा धावता आढावा घेणारा असतो. देशाचा निरंतर विकास व्हावा यासाठी तरतूद करण्याचा कोणता प्रयत्न सरकारच्या वतीने सुरू आहे हे सांगण्याचे काम बजेटच्या माध्यमातून केले जाते. देशाचा विकास कशा पद्धतीने होईल हे स्पष्ट करणारा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी त्याची झलक रेल्वे अर्थसंकल्पातून पहावयास मिळते.कोट्यवधी प्रवाशांना व वस्तूंना आपल्या गंतव्य स्थानापर्यंत पोहचविणारी रेल्वे भारतीय दळणवळणाचा कणा आहे. रेल्वे हे देशातील दळणवळणाचे व प्रवासी वाहतुकीचे सर्वांत मोठे माध्यम असल्याने त्याचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करून विकासात्मक भूमिका स्पष्ट केली जाते. 2016-17 या वर्षासाठीचा रेल्वे अर्थसंकल्प रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी लोकसभेत सादर केला. या रेल्वे अर्थसंकल्पात दोन गोष्टी प्रकर्षाने जाणविल्या त्या म्हणजे कोणत्याही नव्या गाड्या त्यांनी सुरू करण्याची व प्रवासी व मालवाहतूक भाड्यात वाढ करण्याची घोषणा केली नाही. दुसरी म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान व सुविधा प्रवाशांना देण्यासाठी सरकार प्रतिबद्ध असल्याचे सांगितले. काही गाड्यांची घोषणा त्यांनी केली मात्र त्या गाड्या कधी सुरू होतील याबाबत कोणतेच सुतोचाव केले नाही.सरकारने रेल्वे अर्थसंकल्पाचे कौतुक केले तर विरोधकांना या अर्थसंकल्पात नाविण्य नसल्याचा आरोप केला आहे. सीएनएक्सने रेल्वे अर्थसंकल्पाविषयी तरुणांची मते जाणून घेतली. यावेळी रेल्वे प्रवास सुखकर व्हावा एवढेच मत तरुणाईने व्यक्त केले. टीअर टू व थ्री शहरांसाठी काहीच नाहीदेशातील पाच-सहा मोठी शहरे सोडली तर बहुतेक शहरांपर्यंत पोहोचण्यासाठी रेल्वे हाच सर्वांत चांगला पर्याय आहे. यामुळेच टीअर टू व टीअर थ्री शहरांपासून मेट्रो शहरांपर्यंतच्या प्रवासासाठी नव्या गाड्या हव्या होत्या. ज्या गाड्या जाहीर करण्यात आल्या त्या केवळ 300 ते 500 कि लोमीटर अंतरावर प्रवास करणाºयांसाठी फायदेशीर आहेत. नागपूरसारख्या शहरांचा यात विचारच केला नाही. - अश्विन अमृते रेल्वे भाड्यात सवलत हवी होतीरेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेमंत्र्यांनी ज्या घोषणा केल्या त्या सोयी मिळतच आहे. रेल्वे स्थानकावर वाय-फाय सेवा देण्याची घोषणा थोडी विचित्र वाटते. आज स्मार्टफोन वापरणारे डाटा पॅकसाठी खर्च करतात. आजकाल सर्वच ठिकाणी मोबाईलची चांगली रेंज असते. अशावेळी फ्री-वाय फाय सेवा देणे म्हणजे नुसतीच भूलथाप म्हणता येईल. यापेक्षा थोडी सवलत रेल्वे भाड्यात द्यायला हवी होती. - महेश मेंघरे सुरक्षेची हमी नाहीच प्रवाशांना सुरक्षा व चांगल्या सेवा देण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय चांगला असला तरी त्याची अंमलबजवाणी कशी होईल याबाबत शंका आहे. रेल्वेतून प्रवाशांच्या वस्तूंची व मालवाहतूक करताना जीन्नसांची चोरी रोखण्यासाठी सुरक्षा यत्रंणेत सुधारणा करण्यावर भर द्यायला हवा होता. - शुभांगी वाघ प्रवाशांना सुविधा मिळेलया रेल्वे अर्थसंकल्पात विशेष असे काही दिसत नसले तरी देखील मूलभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. गरिबांसाठी नव्या गाड्या सुरू करण्यात येणार आहे. गाड्यांमध्ये मोबाईल चार्जर, वातानुकुलित तृतिय श्रेणीचे डबे सोयीचे ठरतील. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रवाशी भाडे वाढले नाही. रेल्वेने चांगल्या सुविधा द्याव्यात यासाठी हा बजेट तयार करण्यात आला हे स्पष्ट दिसते. - दीक्षा वासनिक