अँण्डरसनला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 13:13 IST
गायिका मिरांडा लॅम्बर्टचा बॉयफ्रेंड अँण्डरसन इस्ट स्काय ...
अँण्डरसनला अपघात
गायिका मिरांडा लॅम्बर्टचा बॉयफ्रेंड अँण्डरसन इस्ट स्काय अपघातात गंभीररित्या दूखापतग्रस्त झाला आहे. हा अपघात तेव्हा झाला जेव्हा अँण्डरसन मिरांडाबरोबर स्पेनमध्ये स्कीयग करत होता. या अपघातात अँण्डरसन खाली पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. मात्र वेळीच मिरांडाने त्याला मदत केल्याने मोठा अपघात टळला. सध्या अँण्डरसनवर उपचार सुरू असून, मिरांडा त्याच्यासोबत आहे. गेल्या महिन्यापासून दोघे एकमेकांना डेट करीत असल्याचे समजते.मला कॅन्सर नाहीगायिका जेनेट जॅक्सने सर्व अफवांचे खंडन करीत ट्विटरच्या माध्यमातून सांगितले की, 'मला कॅन्सर झालेला नसून, ही केवळ अफवा आहे'. पुढे तिने म्हटले की, ती पुर्णपणे स्वस्थ असून, 'द ग्रेट फॉरेव्हर' या व्हिडीओ अल्बममध्ये काम करीत आहे. शिवाय तिच्या डॉक्टरांनी तिला कामावर परतण्यासाठी ग्रीन सिग्नल दिल्याने ती आता पुन्हा व्यस्त होऊ इच्छिते. यावेळी तिने फॅन्सने दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानले.थॅरोनचे फोटोशूटहॉलिवूड अभिनेत्री चार्लीज थॅरोनने फोटोशूट दरम्यान तिच्या सहकार्यांना एक किस्सा सांगून संगळ्यानाच धक्का दिला. ती म्हणाली की, हा फोटोशूट तिला तिच्या पहिल्या सेक्स सीनची आठवण करून देतो. एक फिल्म साप्ताहिकाचे फोटोशूट करताना तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी थॅरोनने बेडवर न्यूड पोज देत फोटोशूट केले. या फोटोंमध्ये थॅरोन अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. फोटोशूट दरम्यान उपस्थित लोकांचे म्हणणे आहे की, थॅरोप यापूर्वी कधीही एवढी सुंदर आणि आकर्षक बघितली नाही.