शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

​...आणि ती फक्त मैत्री असते !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2016 18:07 IST

‘मैत्रीला काही गंध नसतो, मैत्रीला फक्त छंद असतो,

-रवींद्र मोरे ‘मैत्रीला काही गंध नसतो,  मैत्रीला फक्त छंद असतो, मैत्री सर्वांनी करावी, त्यातच जीवनाचा खरा आनंद असतो...!’खरा मित्र आपण जी गोष्ट सांगतोय ती ऐकूण घेईल, ती समजून घेईल, दु:ख असताना आपल्याला वेळ देईल, गरज असल्यावर लगेच धावत येईल, प्रत्येक गोष्टीत सहकार्य करेल. फक्त फ्रेंडशिप  बेल्ट बांधणे म्हणजे मैत्री नव्हे. मित्र हे केवळ बाहेरचेच नसून रक्ताच्या नात्यातदेखील खरे मित्र असू शकतात. त्यात आई, वडील, बहिण, भाऊ, आजी, आजोबा हे देखील चांगली आणि खरी मैत्री निभवू शकतात. मग खरा मित्र कोण व कसा असावा आणि तो कसा ओळखावा, याबाबत आज आंतरराष्ट्रीय मैत्री दिवसानिमित्त ‘सीएनएक्स’ने घेतलेला आढावा...आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस म्हणजेच फ्रेंडशिप डे प्रत्येक वर्षी आॅगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. आपल्या समोर प्रशंसा आणि पाठीमागे निंदा करणारा कधीही खरा मित्र असू शकत नाही. खरा मित्र तोच, जो आपल्याला गरजेच्या वेळी मदत करतो, आपल्या चांगल्याचा विचार करेल. असा ओळखा खरा मित्रचांगल्या गोष्टींवर लक्ष देतोखरा मित्र आपल्यातील चांगल्या गुणांवर लक्ष देतो. तो कधीही आपली दुसºयांसमोर निंदा करीत नाही, तर नेहमी आपल्या गुणांंची प्रशंसा करतो.खोटं बोलत नाहीखरा मित्र आपल्याशी कधीही खोटं बोलत नाही आणि नाटकही क रीत नाही. आपण त्याच्या समोर हसू शकता, रडू शकता, तसेच वेगवेगळे हावभाव करू शकता. एवढे करुनही त्याच्याकडून आपण प्रत्येकवेळी मिळवाल फक्त प्रेम आणि स्रेह. दयावानखरा मित्र आपल्या संक टाच्या वेळी नेहमी आपल्या सोबत असतो. तो कधीही संकट प्रसंगी आपला सहवास सोडून जात नाही. चुक झाली तरी क्षमा असतेखरा मित्र आपल्या चुकांना समजू शकतो. त्यांना कधीही मोठा इश्यू करीत नाही, तर तो त्या चुका सहज क्षमा करतो. मात्र ही चुक पुन्हा नव्हे, अशा मैत्रीपूर्ण भावात समजूतही देतो. म्हणणे ऐकूण आणि समजून घेतोखरा मित्र आपल्या समस्यांना लक्षपूर्वक ऐकतो, समजूनही घेतो आणि योग्य तो सल्ला देतो. तो मध्येच टोकत नाही. धनाचा लोभ नसतो खºया मैत्रीत पैसे किंवा धनाचा विषयच नसतो. त्याची नजर कधीही आपल्याजवळ असलेल्या धनसंपत्तीवर नसते. तो गरजेच्या वेळी स्वत:जवळचे पैसे खर्च करून मदत करण्यास तयार असतो. प्रोत्साहन देतो तो जीवनाच्या प्रत्येक प्रसंगी आपणास पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देईल. आपल्या सुप्त गुणांना चालना देऊन आपले ध्येय गाठण्यासाठी आपणास समर्थन देईल. ईर्षा ठेवणार नाहीआपल्याला मिळालेल्या यशाबाबत कधीही ईर्षा ठेवणार नाही, तर आपल्या सुखात सहभागी होईल. त्याचे वागणे प्रत्येक दिवसासारखे सामान्य असेल. वाईट मित्र कसा ओळखाल नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की, ज्याच्या आयुष्यात खरा मित्र असतो तो इतरांपेक्षा काही वर्ष जास्त जीवन जगतो. कारण तो येणाºया प्रत्येक संकटावर सहज मात करतो. मग आपण चांगला आणि वाईट यातील फरक जाणता का? खºया मैत्रीमुळे आपले जीवन सुखकर होते तर दुसरीकडे वाईट मित्रांमुळे आयुष्यात समस्या उद्भवतात. तर खालील काही बाबींद्वारे आपण वाईट मित्र ओळखू शकता.वरचढ आणि बॉसगिरी करणाराजो नेहमी आपल्यावर वरचढ आणि बॉसगिरी करतो तो कधीच आपला खरा मित्र नसतो. याप्रकारचा मित्र, मित्र नसून तो हुकूमशहाच असतो. म्हणून अशांशी चुकूनही कधी मैत्री करू नये. अपमानीत करणारा आपला मित्र जर सर्वांसमोर आपली कमजोर बाजूचे प्रदर्शन करु न खिल्ली उडवितो आणि चांगल्या गोष्टींपासून लांब राहण्यास वारंवार सांगत असेल अशा मित्रांशी कु ठलेही नाते आपल्यासाठी घातक ठरेल. अशा मित्रांना त्वरीत आपल्या यादीतून आऊट करा. स्वार्थी मित्रांपासून लांब रहाकाही मित्र फक्त गरज असते तेव्हाच आठवण करतात आणि आपल्याशी नाते ठेवतात. असे स्वार्थी मित्र आपले मन वळविण्यात हुशार असतात. त्यांच्या जवळ अनेक कारणेही असतात. अशा लोकांपासून चार हात लांब राहणेच कधीही योग्य. ईर्षा करणारे काही मित्रांना आपणास मिळालेल्या यशाबाबत ईर्षा होत असते. त्यांना कधीही आपली प्रगती सहन होत नाही. असे लोक खूपच घातक असतात. ते कधीही आपणास इजा पोहचू शकतात. म्हणून अशा मित्रांपासून नेहमी सतर्क रहा अन्यथा त्याच्याशी मैत्री ठेऊच नका. शेवटी एकच सांगावेसे वाटते की, ‘ सुखाच्या प्रसंगी हात धरणे म्हणजे मैैत्री नव्हे... तर दु:खाच्या काळात हात न सोडणे म्हणजे खरी मैत्री !!!’