शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

​...आणि मॅन बुकर प्राईजचे काउंट-डाऊन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 23:04 IST

‘मॅन बुकर प्राईज 2016’ या पुरस्कारासाठी पात्र अंतिम १३ पुस्तकांची नावे घोषित करण्यात आली आहेत.

दरवर्षी सर्वोत्तम इंग्रजी कादंबरीसाठी दिल्या जाणाऱ्या ‘मॅन बुकर प्राईज’ या पुरस्कारासाठी पात्र अंतिम १३ पुस्तकांची नावे घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये  द. आफ्रिकेचे जे. एम. कोएट्झी आणि अमेरिकतील पुलित्झर विजेत्या एलिझाबेथ स्ट्राऊट यासारख्या प्रसिद्ध लेखकांचा सामावेश आहे.कोएट्झी यांची ‘द स्कूलडेज् आॅफ जीझस्’ आणि स्ट्रॉऊट यांची ‘माय नेम इज लुसी बार्टन’ कादंबरी यंदा स्पर्धेत आहे. यावेळी इयान मॅकइव्हान, डॉन डीलिलो हेदेखील काही नवख्या आणि उभारत्या लेखकांशी स्पर्धा करणार आहेत. आॅस्ट्रेलियामध्ये स्थायिक असलेले कोएट्झी यांना सट्टेबाजांची पहिली पसंती आहे. असे झाले तर त्यांना तीनदा मॅन बुकर प्राईज जिंकणारा पहिला लेखक होण्याचा बहुमान मिळेल. याआधी १९८३ मध्ये ‘लाईफ अँड टाईम्स आॅफ मायकल के’ आणि १९९९ साली ‘डिसग्रेस’ कादंबरीसाठी त्यांना बुकर मिळालेला आहे.२००९ साली ‘आॅलिव्ह किटरिज’साठी स्ट्राऊट यांना ‘पुलित्झर प्राईज’  मिळाले होते. याच नावाने या कादंबरीवर टीव्ही मिनीसीरिजदेखील बनवण्यात आली आहे, ज्यामध्ये फ्रान्सिस मॅकडॉरमँडची प्रमुख भूमिका आहे.जे. एम. कोएट्झी आणि  एलिझाबेथ स्ट्राऊटअंतिम तेरा पुस्तकांच्या यादीमध्ये यावर्षी डेव्हिड मीन्स (हिस्टोपिया), वायल मेम्युईर (द मेनी), ओटेस्सा मॉशफे (ईलिन) आणि वर्जिनिया रीव्हज् (वर्क लाईफ एनी अदर) या चार नवलेखकांचा सामावेश आहे. २५ आॅक्टोबर रोजी विजेत्याची घोषणा करण्यात येणार असून लेखकाला ५० हजार पाऊंडची (सुमारे ४४ लाख रु.) रक्क्म देण्यात येते.