अन् सोळावं वरीस धोक्याचं !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2017 15:48 IST
जड झालाय मला माझा तरुणपणा, आले वयात मी काय माझा गुन्हा....अन् सोळावं वरीस धोक्याच गं..
अन् सोळावं वरीस धोक्याचं !
-Ravindra More‘हात झाकू किती चांद मुखड्यावरीसोळा वर्ष उभी अंग अंग अंगावरीजड झालाय मला माझा तरुणपणाआले वयात मी काय माझा गुन्हा..’‘तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचंअन् सोळावं वरीस धोक्याच गं.. सोळावं वरीस धोक्याचं..’‘सोळावं वर्ष धोक्याचं’ म्हणतात ते काही खोटं नाही. या वयात मुलं-मुली प्रेमात पडतात. प्रेम हि एक चांगली, प्रेमळ आणि निर्मल भावना आहे, परंतु ते कोणत्या वयात करावे हे सुद्धा कळले पाहिजे. या तारुण्याच्या दिशेने वळताना एकदाकी तरुणाई प्रेमात पडली तर मग करिअर कडे दुर्लक्ष करायला ही मागे-पुढे पाहत नाही. या वयात तारुण्याच्या भावना निर्माण होणं स्वाभाविकच आहे. म्हणूनच या काळात स्वत:ला जपलं पाहिजे. कारण घसरण्याच्या जागा या काळात अजिबात दिसत नाहीत. म्हणूनच योग्य ठिकाणी सावरलं नाही तर घसरणे अटळ आहे. प्रेमाच्या विषाणूची बाधा होण्यात गैर काही नाही. पण हा विषाणू तुमचे करीयर आणि नातेसंबंध यांचा सत्यानाश करू शकतो. त्यामुळे याचा डंख मर्यादित राहू द्यायला शिकले पाहिजे.आपल्याला प्रत्येक वयात वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे घाईत घेतलेला निर्णय भविष्याची डोकेदुखी ठरता कामा नये. त्यामुळे सोळाव्या वर्षात तोलून मापून पाऊल उचलले पाहिजेसोळाव्या वर्षी घ्यावयाची काळजी-१. आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा. शिक्षणच आयुष्यभर तुमच्या उपयोगी पडेल.२. लोकांच्या सांगण्यावर जाऊ नका, निर्णय घेताना विवेक बुध्दीचा वापर करा.३. काहीच सुचत नाही, अशा स्थितीत विश्वसनीय मित्राचा सल्ला घ्या.४. आपले चुकीच्या दिशेने पडणारे एक पाऊलही कुटुंबासाठी नुकसानदायी ठरू शकते.५. तारूण्याच्या उंबरठ्यावर चुकीचा निर्णय किंवा चुकीच्या दिशेने पडणारे पाऊल भविष्य उध्ववस्त करू शकते.६. आपल्या मनातील गोष्ट आई- वडिलांसोबत शेयर करा, त्याने तुमचे मन हलके होईल व अभ्यासात तुमचे मन रमेल.