अमिताभमुळे होतो खूप टेन्शनमध्ये- सचिन खेडेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2016 20:52 IST
टीव्ही व सिनेअमिनेता सचिन खेडेकर नुकताच रायपूरला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाला होेता.
अमिताभमुळे होतो खूप टेन्शनमध्ये- सचिन खेडेकर
टीव्ही व सिनेअमिनेता सचिन खेडेकर नुकताच रायपूरला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाला होेता. यावेळी मीडियाशी बोलताना त्याने आपल्या खाजगी आणि प्रोफेशनल आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी शेअर केल्या. अमिताभ बच्चनमुळे दीर्घकाळ होतो टेन्शनमध्ये......काय कारण होते टेन्शनचे...* मराठीतील ‘कौन बनेगा करोडपती’चे दोन सीझन सचिनने होस्ट केले होते.* शो ची आॅफर आल्यानंतर सचिनने क्षणाचाही विलंब न करता लगेच होकार दिला होता. * अमिताभ बच्चनने ‘कौन बनेगा करोडपती’ला यशोशिखरावर नेले होते.* जेव्हा सचिन शो करायला लागला, तेव्हा त्याची तुलना लोक अमिताभशी करायला लागले. * सचिनच्या शो चा दर्जा अमिताभच्या शो सारखा राखणे हे त्याच्यासाठी एक मोठे आवाहन होते. त्यामुळे सचिन होता खूप टेन्शनमध्ये राहायचा.* अमिताभचे शूटिंग लाइव्ह किंवा त्यांना टीव्हीवर बघताना सचिन अधिक नर्व्हस व्हायचा.* सचिनने बिग बीचे होस्टिंग टेक्निक्स फॉलो केल्या आणि दोन सीझन यशस्वीरित्या हाताळले.