अमेरिकन युद्ध छायाचित्रकाराचा स्पेनकडून सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 17:32 IST
जेम्स नॅच्टवेयचा स्पेनचा सर्वोच्च सन्मान देऊन गौरव करण्यात आला आहे.
अमेरिकन युद्ध छायाचित्रकाराचा स्पेनकडून सन्मान
अमेरिकेचा प्रसिद्ध युद्ध छायाचित्रकार जेम्स नॅच्टवेयचा स्पेनचा सर्वोच्च सन्मान प्रिन्सेस आॅफ आॅस्ट्रियाज कॉम्युनिकेशन्स अँड ह्युमेनटिज् प्राईज देऊन गौरव करण्यात आला आहे.अलिकडच्या काळातील अनेक युद्धांमधील हृदय पिळवून टाकणारे क्षण कॅमेऱ्यात टिपून त्याने मानवी शोकांतिका जगासमोर मांडलेली आहे. सन्मान करणाऱ्या कमिटीने त्याचा ‘मानवी दु:खाचा अभ्यासू छायाचित्रकार’ असे वर्णन केलेले आहे.जगातील सर्वोत्तम युद्ध छायाचित्रकार आणि छायापत्रकार म्हणून नॅच्टवेयची ओळख आहे. त्याच्या व्यावसायिक वचनबद्धतेची प्रशंसा करताना कमिटी त्याच्याबद्दल लिहिते की, पत्रकारितेची मुल्य जपून युद्धा सारख्या असुरक्षित परिस्थित आपल्या काम चोख बजावण्याची त्याची क्षमता व हतोटी विलक्षण आहे.68 वर्षीय नॅच्टवेयने 1976 साली न्यू मेक्सिको येथ्े एका वर्तमानपत्रात छायाचित्रकार म्हणून सुरुवात केली. 1980 साली न्यू यॉर्कला स्थलांतरित झाल्यावर त्याने फ्रीलॅन्सिंग मॅगझिन छायाचित्रकार म्हणून काम सुरू केले. युद्ध छायाचित्रकार म्हणून त्याच्या करिअरची सुरवात 1981 सालच्या नॉदर्न आयर्लंड हिंसाचारापासून झाली.टाईम मॅगझीन सोबत 1984 सालापासून जोडलेला असून 1986 ते 2001 पर्यंत तो मॅग्नम फोटो एजन्सीचा सदस्य होता. मध्य अमेरिका, मध्यपूर्व आणि आफ्रिकेतील युद्धांमध्ये त्याने काम केलेले आहे. त्याच्या वेबसाईटवर तो म्हणतो की, माझी छायाचित्रे या हिंसक युद्धाची साक्षीदार आहेत. मी टिपलेला क्षण कधी विस्मृतीत जाऊ नये आणि त्याची पुनरावृत्ती होऊ नये अशी माझी इच्छा आहे.