शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
3
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
4
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
5
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
6
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
7
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
8
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
9
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
10
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
11
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
12
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
13
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
15
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
16
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
17
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
18
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
19
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
20
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...

‘अलिशा अब्दुल्ला’ - भारताची पहिली महिला रेसिंग चॅम्पियन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 12:14 IST

चैन्नईतील तरूण युवती अलिशा अब्दुल्ला ही रेसिंगच्या क्षेत्रात स्वत:ला अव्वल सिद्ध करत आहे. 

चैन्नईतील तरूण युवती अलिशा अब्दुल्ला ही रेसिंगच्या क्षेत्रात स्वत:ला अव्वल सिद्ध करत आहे. चाकांसोबत खेळ करणारी ती रॉकस्टार ठरली आहे. तेरा वर्षांची असताना पासून ती रेसिंगच्या क्षेत्रात काहीतरी एकदम हटके करायचे हे ठरवूनच आली होती. तिचे वडील आर. ए. अब्दुल्ला हे देखील उत्तम रेसर होते. ११ वर्षीय अलिशा जेव्हा सर्व प्रकारच्या रेस जिंकली तेव्हा सर्व जगाचे लक्ष तिच्याकडे वळले. आणि वय वर्षे १३ ला तिने नॅशनल लेव्हल फॉर्म्युला कार रेसिंगच्या ओपन क्लासमध्ये ‘एमआरएफ नॅशनल गो-कार्टिंग चॅम्पियनशिप’ आणि ‘बेस्ट नोव्हाईस अ‍ॅवॉर्ड’ जिंकला. बाईक रेसिंगचा प्रवास : जेव्हा ती १५ वर्षांची झाली तेव्हा तिने तिचा मार्ग  सुपर बाईक रेसिंगकडे वळवला. २००४ मध्ये ती केवळ ‘जेके टायर नॅशनल रेसिंग चॅम्पियनशिप’ पाचव्या क्रमांकाववर आली एवढेच नाही तर तिने रेसींगच्या इतर प्रकारांमध्ये देखील सहभाग घेतला. तिच्या वडिलांनी तिचा सुपर बाईक रेसिंगमधील इंटरेस्ट पाहून त्याच प्रकाराला पुढे नेण्याचा विचार केला. २०१० मध्ये अलिशा चारचाकी गाड्यांकडे वळली. दुचाकी वाहनासोबत तिच्या अपघात झाल्यानंतर तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की,‘संपूर्णपणे पुरूषी वर्चस्वाखालील या खेळात पुरूषांचे इगो माझ्यात मार्गात आले. अनेकवेळेस मुलगी पुढे जातीये हे पाहून त्यांनी माझ्या गाडीला अपघातही केला. न घाबरता त्यांना मी पुन्हा ठामपणे उभी राहून त्यांना उत्तर दिले. मला बाईक्स आवडत असूनही मग मी बाईक्स न चालवण्याचे ठरवले.’ चित्रपटात डेब्यू : क्रीडा क्षेत्रात अलिशाला आलेल्या अनुभवानंतर तिने चित्रपटात डेब्यू करण्याचा निर्णय घेतला. ती २००४ मध्ये तमीळ चित्रपट ‘इरंबू कुथीराई’ यात काम केले. यावर्षीही ती एका चित्रपटासाठी काम करत आहे. तिला ब्युटी क्वीन बनलेलं पाहिल्यानंतर सर्व जगानेच आश्चर्य व्यक्त केले. पण याबद्दल ती म्हणते,‘तुम्ही एकदा काही करायचे ठरवले ना की, मग तुम्हाला कुठलीच गोष्ट कठीण नसते. मी देखील निराश झाले होते. पण काही गोष्टींनी मला खुप स्ट्राँग केले.