शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

Alert : आता फेसबुक युजर्सच्या प्रत्येक हालचालींवर वेबकॅमद्वारे ठेवणार लक्ष !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2017 15:58 IST

इंटरनेटचा वापर करणाऱ्या सर्व युजर्सची डिजीटल कुंडली फेसबुक आणि गुगलकडे आहे, हे आपणास कदाचित माहिती असेलच.

-Ravindra Moreआता युजर्सच्या प्रत्येक हालचालींवर फेसबुक वेबकॅमद्वारे लक्ष ठेवणार आहे. त्यासंबंधीचे तंत्रज्ञान लवकरच विकसित केले जाणार असून त्याच्या पेटंटसाठी अर्जदेखील करण्यात आला आहे. इंटरनेटचा वापर करणाऱ्या सर्व युजर्सची डिजीटल कुंडली फेसबुक आणि गुगलकडे आहे, हे आपणास कदाचित माहिती असेलच. ही जरी चिंतेची बाब आहे, मात्र काळाचीदेखील गरज आहे. याचेच पुढचे पाऊल म्हणजे आता फेसबुकने चक्क युजरच्या वेबकॅमच्याच मदतीने त्यावर नजर ठेवण्याचे तंत्रज्ञान विकसित करून याचे पेटंट मिळावे म्हणून अर्जदेखील दाखल केला आहे. या अर्जात भरण्यात आलेल्या माहितीनुसार फेसबुक या माध्यमातून युजरच्या हालचालींचे निरिक्षण करून याचे विश्लेषण करणार आहे. अर्थात आपण आपल्या यादीत असणाऱ्या एकाद्या मित्राने शेअर केलेल्या छायाचित्राकडे पाहून हसलो तर लागलीच याची माहिती फेसबुककडे जमा होईल. याचे विश्लेषण करून फेसबुक संबंधीत युजरच्या मनोवृत्तीशी संबंधीत सर्व माहिती मिळवू शकतो. याचसोबत संबंधीत युजरला त्या छायाचित्राशी संबंधीत तसेच ते शेअर करणाऱ्या युजरच्या जास्त पोस्ट त्याच्या न्यूज फिडमध्ये दिसू लागतील. तर एखादी पोस्ट, छायाचित्र वा व्हिडीओकडे त्या युजरने दुर्लक्ष केले तर त्याच्या न्यूज फिडमध्ये याच्याशी संबंधीत कंटेंट कमी प्रमाणात दिसेल. फेसबुकने या प्रकारच्या प्रणालीसाठी पेटंट दाखल केल्यामुळे सायबर विश्वात प्रचंड खळबळ उडाली आहे. अर्थात अनेक टेक पोर्टल्सनी याबाबत संपर्क करूनही फेसबुकने यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. या संदर्भात सविस्तर अहवाल सीबी इनसाईट या संस्थेने छापला आहे.