पैसे दिल्यानंतर 'ही' कंपनी घडवते ब्रेकअप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 21:07 IST
तुम्ही ‘ब्रेकअप शॉप’ कंपनीची मदत घेऊन प्रेमसंबंध संपवू शकता.
पैसे दिल्यानंतर 'ही' कंपनी घडवते ब्रेकअप
आजच्या घडीला लग्न, प्रेम जुळवणार्या डेटींग अॅप्सचा पर्याय उपलब्ध असताना ब्रेकअपचा पर्यायही उपलब्ध झाला आहे.तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड सोबत रहाण्यात स्वारस्य नसेल, तुम्हाला त्या नात्याचा उबग आला असेल तर, तुम्ही ‘ब्रेकअप शॉप’ कंपनीची मदत घेऊन प्रेमसंबंध संपवू शकता. यासाठी १० ते ४० डॉलरपर्यंत (६७० ते २७०० रु) रक्कम आकारली जाते. तुम्ही कुठली सेवा निवडता त्यावर रक्कम ठरते. मॅकेंझी आणि इव्हान या दोन कॅनडीयन भावांनी एकत्र येऊन ही कंपनी स्थापन केली आहे.वेबसाईटवर जाहीरात केल्यानुसार आम्ही सर्व सेवा देतो, असे त्यांनी सांगितले. प्रेमसंबंध संपवण्यासाठी मोबाईलवरुन मेसेज, फोन, ई-मेल आणि हस्तलिखित पत्राची सेवा ही कंपनी देते. मोबाईल मेसेजसाठी सर्वात कमी १० आणि हस्तलिखित पत्रासाठी सर्वाधिक ३० डॉलर आकारले जातात. तत्काळ सेवा हवी असल्यास जास्त रक्कम घेतली जाते. ब्रेकअप संदेश काय असावा हे स्वत: ग्राहक ठरवू शकतो किंवा कंपनीतील तज्ञ ग्राहकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर संदेश बनवतात. या कंपनीचे खास ब्रेकअॅपही असून तुम्हाला अशा कुठल्या नात्यातून सुटका करुन घ्यायची असेल तर, आता ब्रेकअप आॅप्शनही उपलब्ध आहे.