अदिती शिकतेय तामिळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 16:44 IST
सिनेदिग्दर्शक मणिरत्नम यांच्या एका तामिळ रोमँटिक चित्रपटाकरिता अदिती तमिळ भाषा शिकतेय.
अदिती शिकतेय तामिळ
सिनेदिग्दर्शक मणिरत्नम यांच्या एका तामिळ रोमँटिक चित्रपटाकरिता अदिती तमिळ भाषा शिकतेय. फिल्म युनिटच्या सूत्रांनुसार मणिरत्नमने अदितीला फिल्मचे शूटिंग व्यवस्थित व्हावे यासाठी शूटिंग सुरू होण्यापूर्वीच तामिळ शिकायला सांगितलंय. मात्र अजून हे नक्की कळले नाही की तिच्या लाईन्स तीच डब करणार की कुणी दुसरं...या चित्रपटात तामिळ अभिनेता कार्थी पायलटच्या मुख्य भूमिकेत असणार आहे. सिनेमाला संगीत ए. आर. रेहमान यांनी दिले असून त्याने ते शूटिंग सुरू होण्याच्या आधीच पूर्णदेखील झालंय. हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.