शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
3
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
4
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
5
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
6
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
7
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
8
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
9
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
10
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
11
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
12
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
13
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
14
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
15
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
16
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
17
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
18
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
19
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
20
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र

व्यायाम करताना कपडेही हवेत खास. अ‍ॅक्टिवेअर फॅशनमुळे वाढतो व्यायामाचा उत्साह.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 18:36 IST

योगा करताना, ट्रॅकवर चालायला किंवा पळायला जाताना, जिममध्ये व्यायाम करताना किंवा अगदी नृत्याची पूर्वतयारी, पीटी वगैरे करताना आवर्जून हे स्पोर्ट्सवेअर, अ‍ॅक्टिव्हवेअर घालण्यास अलिकडे पसंती दिली जात आहे.

ठळक मुद्दे* स्पोर्ट्सवेअर आणि एक्टिव्हवेअर कपड्यांमुळेही खरंतर व्यायाम करायला अधिक उत्साह येऊ शकतो.* महिलांकरिता डिझाईन केलेल्या स्पोर्ट्सवेअरच्या रंगांमध्ये गुलाबी, निळ्या अशा फ्रेश, उत्साहवर्धक रंगांचा वापर अधिक केला आहे.* या कपड्यांसाठी वापरलं जाणारं कापड हे आर्द्रता शोषून घेणारे असतं. मऊ, कमी वजनाचे, ताणले जाणारे असे कापडच या प्रकारच्या कपड्यांसाठी वापरलं जातं. त्यामुळे हे कपडे घालून व्यायाम केल्यास विशेषत: घामाची दुर्गंधी कमी प्रमाणात जाणवते.

- मोहिनी घारपुरे-देशमुखहल्ली अनेकजण रोजच्या कामात व्यायामाला महत्त्व देतात. त्यातही योगाच्या क्लासला, जिमला, झुम्बा क्लासला जाणार्याच प्रमाण वाढलं आहे. जेवढी सजगता व्यायामाच्या बाबतीत दाखवली जाते तेवढाच चोखंदळपणा व्यायामाच्या कपड्यांच्या बाबतीतही केला जातो. तासाभराचा वर्क आउट का असेना पण तिथेही ट्रेण्डी कपडे घालण्याचा अनेकांचा अट्टाहास असतो. खरंतर अशा या आग्रहातूनच जगभरात स्पोर्टसवेअरच्या फॅशनची चलती आहे. त्यासाठी एक्टिव्हवेअरची एक मोठी रेंज बाजारात उपलब्ध आहे. फॅशनच्या जगात रमणार्या आणि आनंदानं फॅशन फॉलो करणार्या लोकांना या स्पोर्ट्सवेअर आणि एक्टिव्हवेअर कपड्यांमुळेही खरंतर व्यायाम करायला अधिक उत्साह येऊ शकतो असं म्हणणंही वावगं ठरणार नाही.

 

 

योगा करताना, ट्रॅकवर चालायला किंवा पळायला जाताना, जिममध्ये व्यायाम करताना किंवा अगदी नृत्याची पूर्वतयारी, पीटी वगैरे करताना आवर्जून हे स्पोर्ट्सवेअर, एक्टिव्हवेअर घालण्यास अलिकडे पसंती दिली जात आहे. अमेरिकेत तर या फॅशनेबल कपड्यांची 2011 सालापासून प्रचंड चलती आहे की या प्रकारच्या कपड्यांच्या विक्रीत वर्षभरात 3.2 टक्क्यांनी वाढ झाल्याचं एनपीडी ग्रूपच्या एका अहवालात म्हटलं आहे.ग्राहकांच्या सवयींचा अभ्यास करणर्या या एनपीडी ग्रूुपनं सादर केलेल्या अहवालात या प्रकारच्या फॅशनेबल कपड्यांच्या ग्राहक महिलाच सर्वाधिक आहेत. 2010 मध्ये या प्रकारच्या कपड्यांच्या महिला ग्राहकांचं प्रमाण 6.7 टक्के होतं तर 2011 मध्ये त्यात 3.1 टक्क्यांनी वाढ झाल्याचंही समोर आलं आहे.

काही फॅशन डिझायनर्सच्यामते महिलांकरिता उपलब्ध असलेल्या या स्पोर्ट्सवेअर्समध्ये गेल्या काही वर्षात अनेक बदल झाल्यानेच त्यांची विक्री वाढली आहे. पूर्वी पुरूषांच्याप्रमाणेच बायकांकरीताचे स्पोर्ट्सवेअर डिझाईन केले जायचे. परंतु आता तसं होत नाही. विशेष म्हणजे महिलांकरिता डिझाईन केलेल्या स्पोर्ट्सवेअरच्या रंगांमध्ये गुलाबी, निळ्या अशा फ्रेश, उत्साहवर्धक रंगांचा वापर अधिक केल्यानंतर त्यांची विक्री  वाढल्याचं जाणवतं.

फॅशन डिझायनर्सना लाइफस्टाइलचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की व्यायामाच्या वेळा आणि व्यायामांच्या पद्धती ही देखील फॅशनसाठी एक मोठी बाजारपेठ आहे. अमेरिकेतील महिलांसाठी कॅज्युअल स्टाइलचे कपडे हेच बहुतांशवेळा फॅशन स्टेटमेण्ट असतात. त्यामुळे त्यांनी त्याचाच वापर करून कॅज्युअल लुक देणारे स्पोर्ट्सवेअर बाजारपेठेत आणले. हा ट्रेण्ड इतका लोकिप्रय झाला की त्यानंतर बाजारपेठेत एथ्लेजर नावाची कॅज्युअल क्लोदींगचीही नवी रेंज लॉन्च करण्यात आली.स्पोर्ट्सवेअर ही रेंज केवळ कपड्यांपुरती मर्यादीत न ठेवता त्याअंतर्गत अनेक प्रकारचे प्रोटेक्टीव्ह गेअरही लाँच करण्यात आले. उदाहरणार्थ फुटबॉल खेळताना घालावयाचं हेल्मेट, शिन पॅड्स, हेड गिअरस, गम शिल्ड्स, शोल्डर पॅड्स वगैरे..

 

या प्रकारच्या कपड्यांसाठी वापरलं जाणारं कापड हे आर्द्रता शोषून घेणारे असतं. मऊ, कमी वजनाचे, ताणले जाणारे असे कापडच या प्रकारच्या कपड्यांसाठी वापरलं जातं. त्यामुळे हे कपडे घालून व्यायाम केल्यास विशेषत: घामाची दुर्गंधी कमी प्रमाणात जाणवते.

सध्या बाजारात स्पोर्ट्सवेअर आणि एक्टिव्हवेअर या रेंज अंतर्गत टीशर्ट्स,स्पोर्ट्स ब्राज, जर्सीज, सॉक्स, ट्रॅकसूट्स आणि पोलो शर्ट्स आदी प्रकार उपलब्ध आहेत. फ्लोरोसन्ट रंगांचाही हमखास वापर या प्रकारच्या कपड्यांमध्ये केला जातो हे आणखी एक विशेष.मग तुम्हीही जर व्यायाम वगैरे करत असाल किंवा व्यायामाला सुरूवात करणार असाल तर स्पोर्ट्सवेअर वापरून पहाच..बघा तुमचा उत्साह द्विगुणित होतो की नाही ..