शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

​ट्विटरवरील अपशब्द प्रकरणी अभिजीतवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 15:05 IST

ट्विटरवर अपशब्द वापरल्याप्रकरणी गायक अभिजीत भट्टाचार्य यांच्यावर ‘आप’च्या नेत्या प्रीति मेनन यांनी केलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ट्विटरवर अपशब्द वापरल्याप्रकरणी गायक अभिजीत भट्टाचार्य यांच्यावर ‘आप’च्या नेत्या प्रीति मेनन यांनी केलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी गायक अभिजीतला चौकशीला सामोरे जावे लागेल.पत्रकार स्वाती चतुवेर्दी आणि जनताकारिपोर्टर.कॉमच्या मुख्य संपादक रिफात जावेद यांना अभिजीत यांनी आक्षेपार्ह ट्वीट केले. चेन्नईतील इंजिनिअर तरुणीच्या हत्या प्रकरणातील आरोपी मुस्लिम असल्याचा दावा करत अभिजीत यांनी ट्वीट केले होते. प्रत्यक्षात संशयित आरोपी मुस्लिम नसल्याचे समजते. अभिजीत धार्मिक तेढ निर्माण करुन कायदा-सुव्यवस्थेत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं ट्वीट स्वाती चतुवेर्दी यांनी केलं. यामध्ये मुंबई पोलिसांना मेन्शन करुन अभिजीत विरोधात कारवाईची मागणीही त्यांनी केली.याचा राग येऊन संतापलेल्या अभिजीत यांनी ‘निर्लज्ज म्हातारे’ अशा शब्दात स्वातींवर संताप व्यक्त केला.  तू पाकिस्तानींचे पंजे चाटत असल्याचं म्हणत अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ केली. जनताकारिपोर्टर.कॉमच्या मुख्य संपादक रिफात जावेद यांनी या वादात उडी घेत ‘किती संस्कारी आहात’ असा खोचक टोला मारला. यावरही अभिजीतने ‘हो आम्ही भारतीय पाकिस्तानींना लाथ मारतो, हेच आमचे संस्कार आहेत’ असं प्रत्युत्तर दिलं.मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत सायबर क्राईम विभागाकडे तक्रार नोंदवण्यास सांगितलं. त्याचप्रमाणे जवळच्या पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्लाही दिला.