शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

बराक ओबामांच्या ६ लेट नाईट सवयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 23:12 IST

रष्ट्राध्यक्ष ओबामा रात्री उशिरा काय करतात, त्यांच्या लेट नाईट सवयी काय आहेत?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांना केवळ आपल्याच देशाची नाही तर जगभराची चिंता करावी लागते. मुक्त जगातील सर्वात शक्तीशाली पदावर बसणे म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. काटेरी मुखूट म्हणतात ना, तशी काहीशी अवस्था असते. मग अशा सुपरबिझी माणसाला स्वत:साठी वेळ तरी कसा मिळतो? मावळते रष्ट्राध्यक्ष ओबामा रात्री उशिराचा वेळ स्वत:साठी राखून ठेवतात. त्यावेळी ते काय करतात, त्यांच्या लेट नाईट सवयी काय आहेत याबद्दल त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेली ही माहिती.१. रात्रपाळीचा माणूसओबामा रात्री उशिरापर्यंत आपल्या आॅफिसमध्ये बसून काम करत असतात. संशोधनातून असे दिसून आले की, तुम्ही जेव्हा थकलेला असता तेव्हा तुमची सृजनशीलता (क्रिएटिव्हिटी) सर्वाधिक सक्रीय असते.२. बदाम खाओ!रोज रात्री ओबामा सात खारट बदाम खातात. ना एक जास्त, ना एक कमी. यातून त्यांना ४३ कॅलरी, ४ ग्रॅम फॅट, १० मिलीग्रॅम सोडियम आणि १.५ ग्रॅम प्रोटिन मिळते.३. खेळ पाहणेरात्री उशिरा काम करताना ते टीव्हीवर नेहमी खेळाचे चॅनेल लावून ठेवतात. दुसऱ्याला पळताना आपल्याच हृदयाची धडधड, श्वासोच्छवास, रक्तप्रवाह वाढतो जणूकाही आपण स्वत:च पळत आहोत. कादाचित यामुळेच ते खेळ पाहत असावेत.४. केवळ पाच तास झोपते रात्री २ दोन वा. झोपून सकाळी ७ वा. उठतात. म्हणजे झोप केवळ पाच तासांची. परंतु नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या मार्गदर्शकतत्त्वानुसार सहा तासांपेक्षा कमी झोप आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे तल्लखपणा कमी होतो, स्मरणशक्तीची झीज होते (राष्ट्राध्यक्षासाठी दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या) आणि लैंगिक इच्छादेखील कमी होते (नो कॉमेंट!).५. डोकेबाजओबामा रात्री उशिरा त्यांच्या आयपॅडवर ‘वर्डस् वुईथ फ्रेंडस्’ नावाचा शब्दखेळ खेळतात. यामुळे मेंदूचा व्यायाम होतो. पुरेशा बे्रन अ‍ॅक्टिव्हिटीमुळे अल्झायमर्सपासून बचाव होऊ शकतो. ६. कॉफी न पिणेते शक्यतो कॉफी पिण्याचे टाळतात. कॉफीऐवजी ते पाणी पिण्यावर अधिक भर देतात. आता ही सवय जरी चांगली असली तरी कॉफीसुद्धा आरोग्यासाठी खूप लाभदायक असते. प्रौढ व्यक्तीने दररोज ४०० मिग्रॅ (चार कप) कॉफी पिल्यास कॅन्सर आणि हृदयविकारांना आळा बसू शकतो.तर मग या आहेत बराक ओबामांच्या सहा लेट नाईट सवयी. काही अनुकरणीय तर काहींमध्ये त्यांनी सुधारणा कराव्या अशा. येत्या सहा महिन्यात त्यांचा राष्ट्रध्यक्ष म्हणून कार्यकाळ संपणार आहे. एका नावाजलेल्या ब्रिटिश वृत्त वेबसाईटने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार जगभरात ओबामा आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत.