सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आधार कार्ड असलेल्या प्रत्येक नागरिकाला केंद्र सरकारकडून मोफत बाईक दिली जाईल, असा दावा केला जात आहे. मात्र, केंद्र सरकारच्या अधिकृत तपासणीत हा व्हिडिओ एआय-जनरेटेड आणि पूर्णपणे बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट-चेक युनिटने सोशल मीडियावर फिरणाऱ्या या व्हिडिओची सत्यता तपासली. तपासणीमध्ये खालील बाबी उघड झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आधार कार्डधारकांना मोफत बाईक' देण्यासंबंधी कोणतीही घोषणा केलेली नाही. हा व्हिडिओ एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आला आहे.
पीआयबीने नागरिकांना अशा खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून सावधान राहण्याचा सल्ला दिला. पीबीआयबीने आवाहन केले आहे की, अशा चुकीच्या माहितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. लोकांमध्ये चुकीची माहिती पसरवण्यासाठी तयार केलेले असे मेसेज शेअर करणे टाळा. कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवण्यापूर्वी किंवा शेअर करण्यापूर्वी, नेहमीच अधिकृत सरकारी स्त्रोतांकडून त्याची पडताळणी करा.केंद्र सरकारशी संबंधित अचूक आणि विश्वसनीय माहितीसाठी, नागरिकांनी केवळ अधिकृत सरकारी वेबसाइट्सना भेट द्यावी.
Web Summary : A viral video claiming PM Modi is giving free bikes with Aadhaar is fake. PIB confirms it's AI-generated. Beware of misinformation!
Web Summary : आधार कार्ड पर पीएम मोदी द्वारा मुफ़्त बाइक देने का वायरल वीडियो फ़र्ज़ी है। पीआईबी ने पुष्टि की है कि यह एआई-जनरेटेड है। गलत सूचना से सावधान रहें!