शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

Fact Check: लहानगा सापडला वाघाच्या तावडीत, टी-शर्ट काही सोडेना; व्हिडिओत आला मोठा ट्विस्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2025 15:07 IST

Fact Check: काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एक लहानगा मुलगा वाघापेक्षा आईला जास्त घाबरतो, असे दाखवण्यात आले आहे. पण यात एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. जाणून घ्या...

Claim Review : एक लहानगा वाघाच्या पिंजऱ्याबाहेर असून, त्याचा टी-शर्ट वाघाने पकडून ठेवला असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
Claimed By : Social Media User
Fact Check : चूक

Created By: Aaj TakTranslated By: ऑनलाइन लोकमत

Fact Check: काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 'माझा टी-शर्ट सोड, नाहीतर आई ओरडेल', आतापर्यंत तुम्ही एका निष्पाप मुलाचा पिंजऱ्यात बंद वाघाला ही विनंती करतानाचा व्हिडिओ पाहिला असेल. परंतु, बरेच लोक म्हणत आहेत की, ही भारतातील प्राणीसंग्रहालयातील घटना आहे. काही सोशल मीडिया वापरकर्ते व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीला मुलाला मदत करण्यापेक्षा रील बनवणे जास्त महत्त्वाचे वाटल्याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. तर काही जण अशा असंवेदनशील व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करायला हवा अशी मागणी करताना पाहायला मिळत आहेत. परंतु, हा व्हिडिओ, या व्हिडिओतील मुलगा याबाबत एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. 

काही लोकांना असे वाटते की हा व्हिडिओ एडिट केलेला आहे. अशाच एका पोस्टची संग्रहित आवृत्ती (आर्काइव्ड व्हर्जन) येथे पाहता येईल. फॅक्ट चेकमध्ये असे आढळून आले की, हा व्हिडिओ एडिट केलेला नाही किंवा भारतातीलही नाही. हा व्हिडिओ पाकिस्तानी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर नोमान हसन यांनी त्यांच्या वाघ आणि त्यांच्या पुतण्यासोबत बनवला आहे. हा त्यांचा पाळलेला वाघ असल्याचे सांगितले जाते. 

या व्हिडिओची सत्यता कशी शोधली?

आम्हाला आढळले की, डॉ. अब्दुल सत्तार खान नावाच्या एका एक्स युजरने व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आणि तो पाकिस्तानचा असल्याचे म्हटले. तसेच, असे लिहिले आहे की या मुलाच्या कुटुंबाने अनेक सिंह आणि वाघ यांचा सांभाळ केलेला आहे. पाकिस्तानी कायद्यानुसार सिंह आणि वाघ यांसारखे जंगली हिंस्र प्राणी आयात करण्याला परवानगी आहे. तेथील अनेक श्रीमंत लोक असे प्राणी सांभाळणे पसंत करतात, ही बाब येथे नमूद करणे आवश्यक आहे. आम्ही हैदराबादमध्ये राहणारे डॉ. अब्दुल सत्तार यांच्याशी संपर्क साधला. त्याने सांगितले की, या व्हिडिओमध्ये दिसणारा वाघ नोमान हसन नावाच्या पाकिस्तानी सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा आहे. या माहितीचा वापर करून, आम्ही नोमान हसनच्या अधिकृत YouTube चॅनेलवर हा व्हिडिओ शोधला आणि सापडला. इस्लामाबादमध्ये राहणाऱ्या नोमानचे युट्यूबवर सुमारे १.१ कोटी फॉलोअर्स आहेत. तो अनेकदा सिंह, वाघ, बिबट्यासारख्या प्राण्यांसोबतचे विविध प्रकारचे विचित्र व्हिडिओ शेअर करतो.

येथे YouTube व्हिडिओ पाहा

नोमनच्या सोशल मीडिया अकाउंटवर, आम्हाला असे अनेक व्हिडिओ आढळले ज्यात व्हायरल व्हिडिओमधील लहानगा सिंह आणि वाघांसोबत दिसत आहे. एका व्हिडिओमध्ये तो वाघाची साखळी धरून त्याच्याजवळ उभा असल्याचे दिसत आहे. यामध्ये वाघ कोणत्याही पिंजऱ्यातही नाही. अचानक वाघ मुलाचा जोडा तोंडाने धरतो. ते मूल हसते, वाघाच्या डोक्यावर थापट देते आणि त्याला म्हणते, जर हे फुटले तर माझी आई मला ओरडेल. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तो वाघावर स्वार होताना दिसत आहे, जणू काही तो खरा वाघ नसून एखादे खेळणे आहे. 

व्हायरल व्हिडिओबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी नोमनशी संपर्क साधला. त्याने सांगितले की, हा व्हिडिओ इस्लामाबादचा आहे आणि त्यात दिसणारा मुलगा त्याचा पुतण्या असद आहे. आम्ही नियोजन करून हा व्हिडिओ कॉमिक शैलीत बनवला आहे. माझ्याकडे २५ सिंह आणि वाघ आहेत, जे मी आफ्रिकेतून आयात केले आहेत. मी हे सर्व प्राणी माझ्या फार्ममध्ये राहतात. नोमनला असेही विचारले की, या प्राण्यांना कसे प्रशिक्षण देतो का, जेणेकरून कोणालाही इजा करू नयेत. यावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, जर तुम्ही लहानपणापासून एखाद्या प्राण्याला वाढवले ​​तर ते आपोआप प्रशिक्षित होते. ते तुम्हाला ओळखू लागते आणि कधीही तुम्हाला इजा करत नाही. कधीकधी या प्राण्यांच्या नखांनी आपल्याला ओरखडे येतात. पण ते कधीही आपल्यावर हल्ला करत नाहीत.

हिंदुस्तान टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्ये सिंह आणि बिबट्यासारखे प्राणी पाळणे हे पैशाचे आणि सत्तेचे प्रतीक बनले आहे. 

(सदर फॅक्ट चेक Aaj Tak या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाPakistanपाकिस्तानTigerवाघ