शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
4
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
5
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
6
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
7
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
8
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
9
पशुपतिनाथाचे अवतार आणि रक्षेतून प्रगट झाले असे गोरक्षनाथ यांची जयंती; वाचा त्यांचे कार्य!
10
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
11
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
12
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
13
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
14
आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
15
मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू
16
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
17
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
18
अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
19
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
20
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?

Fact Check: नरेंद्र मोदींच्या आवाजात व्हायरल होणारं 'ते' गाणं त्यांनी गायलं नाही, तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 18:32 IST

नरेंद्र मोदी यांच्या आवाजातील एक गाणे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय, त्यात एका फेसबुक युजरने हे गाणे मोदींनीच गायल्याचा दावा केला आहे.

Claim Review : गायक मुकेश यांनी लिहिलेल्या गीताला नरेंद्र मोदींनी त्यांचा आवाज दिला आहे असा दावा करण्यात आला.
Claimed By : Facebook User
Fact Check : चूक

Created By: क्विंट हिंदीTranslated By: ऑनलाइन लोकमत

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंतप्रधान मोदी (Narendra Modi) सलामी देत असल्याचा एक फोटो आहे. बॅकग्राउंडमध्ये राज कपूर यांच्या चित्रपटाचे गाणे चालू आहे.

ही पोस्ट शेअर करून असा दावा केला जात आहे की, "गायक मुकेश यांच्या या गीताला भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपला आवाज दिला आहे.

(या पोस्टची आर्काइव्ह लिंक तुम्ही इथे, इथे आणि  इथे पाहू शकता)

काय आहे सत्यता? 

व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील दावा खोटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्यांच्या आवाजात हे गाणं गायलं नाही. 

AI च्या मदतीने या गाण्यात पंतप्रधान मोदींशी मिळताजुळता आवाज जोडला गेला आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या आवाजात बनलेले अशाप्रकारचे अनेक बनावट गाणी इंटरनेटवर उपलब्ध आहेत

कशी केली पडताळणी?

सर्वात आधी हा व्हिडिओ AI नं बनवलेला आहे का हे तपासण्यासाठी Contrails AI यावर अपलोड केला जेणेकरून हा व्हिडिओ एआयच्या मदतीने बनवला आहे की नाही हे माहिती पडेल.

Contrails AI नं या व्हिडिओत वापरण्यात आलेला ऑडिओ फेक असल्याचं सांगितले.

AI ने तयार केलेले फोटो आणि व्हिडिओ ओळखणाऱ्या एक अन्य टूल TrueMedia ने देखील या व्हिडिओमध्ये छेडछाड झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

यानंतर, यासंबंधित कीवर्ड्स इंटरनेटवर सर्च केल्यावर आम्हाला Modi Music Productions नावाच्या YouTube चॅनलवर हे गाणे सापडले.

या गाण्याच्या शीर्षकात लिहिले होते - 'मोदी - किसी की मुस्कुराहटों पर हो निसार (मोदी AI कवर)

Modi Music Productions नावाच्या या YouTube चॅनलची तपासणी केल्यावर आम्हाला आढळले की, या चॅनलवर AI च्या मदतीने तयार केलेले आणखीही म्युझिक व्हिडिओ उपलब्ध आहेत.

या चॅनलवर विशेषतः पंतप्रधान मोदींच्या AI च्या मदतीने तयार केलेल्या आवाजातून अनेक गाणी बनवली आहेत. सर्व शीर्षकांमध्ये AI कवर असा उल्लेख करण्यात आला आहे. 

निष्कर्ष: व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील दावा चुकीचा असून तो AI ने तयार केलेला एक म्युझिक व्हिडिओ पीएम मोदी यांच्या आवाजात गाणं म्हणल्याचं सांगून शेअर केला जात आहे.

(सदर फॅक्ट चेक क्विंट हिंदी न्यूज या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलNarendra Modiनरेंद्र मोदी