शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्यांच्या घरट्यांचा होणार शास्त्रशुद्ध अभ्यास, मार्गदर्शक तत्त्वे जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 10:50 IST

शहरी भाग असो, वा ग्रामीण भाग, अशा प्रत्येक ठिकाणी पक्ष्यांच्या अभ्यास करताना याची मदत होणार आहे.

ठळक मुद्देघरट्याला किती वेळ, किती दिवस, कोणत्या वेळी भेट द्यावी, याविषयीचे सर्व तपशील यात देण्यात आले आहेत.

- सचिन लुंगसे

मुंबई : विणीच्या हंगामात पक्षी, पक्ष्यांचे घरटे, पक्ष्यांची पिले आणि विणीचा हंगाम याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी अमेरिका, पुणे आणि बंगळुरूमधील पक्षी अभ्यासकांनी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. पक्षी अभ्यासकांना मदत होण्यासोबतच पक्ष्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे महत्त्वाची ठरणार आहेत. शहरी भाग असो, वा ग्रामीण भाग, अशा प्रत्येक ठिकाणी पक्ष्यांच्या अभ्यास करताना याची मदत होणार आहे. घरट्याची, परिसराची नोंद कशी करावी. घरट्याला किती वेळ, किती दिवस, कोणत्या वेळी भेट द्यावी, याविषयीचे सर्व तपशील यात देण्यात आले आहेत. जास्त वेळ घरट्याला भेट दिल्यास पक्षी घरटे सोडून जाण्याची भीती असते. कावळ्यासारखे पक्षी आपल्यावर नजर ठेवून असतात. अशावेळी शिकारी पक्षी अभ्यास करीत असलेल्या पक्ष्याचे घरटे उद्ध्वस्त करू शकतो. पक्ष्यांची अंडी, पक्ष्यांची पिले यांचे वजन घेणे, त्यांची मोजमापे घेणे, हे कसे आणि कोणत्या वेळी करावे, याविषयी माहिती देण्यात आली आहे. पक्ष्यांनी सोडलेले घरटे आढळले, तर आपण त्याच्या नोंदी कशा घ्याव्यात. त्याचे मोजमाप कसे करावे. पक्षी घरट्यात असताना घरट्याचे मोजमाप घेऊ नये, असे अनेक महत्त्वाचे मुद्दे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहेत. पिलांना पंख येतात तेव्हा यातील काही नोंदी घ्याव्यात. मोजमाप करावे. यावेळी हे सोपे जाते. अशावेळी पिलांना कमीत कमी धोका असतो, आदी सूचना यात करण्यात आल्या आहेत.तीन संस्थांच्या  मदतीने उपक्रममुंबईतील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, बंगळुरू येथील नेचर कन्झर्व्हेशन फाऊंडेशन, अमेरिकेतील स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम आॅफ नॅचरल हिस्ट्री या तीन संस्थांच्या मदतीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अमेरिकेतील साहस बर्वे, बंगळुरू येथील टी.आर. शंकररामण, अपराजिता दत्ता आणि पुण्यातील गिरीश जठार यांनी ही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.येथे करा नोंदी : इंडियन बर्ड आणि जर्नल आॅफ बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी येथे पक्षी अभ्यासकांना आपल्या नोंदी करता येतील.संपर्क - info@dnhs.org  आणि ap.indianbirds@gmail.com

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य