शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यात आढळली ‘मोठी पान लवंग’ वनस्पती; महाराष्ट्रात पहिल्यांदाच झाली नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 06:57 IST

डॉ. तन्वीर खान यांनी केली नोंद

अजय पाटील जळगाव : जैव विविधतेने समृध्द सातपुडा पर्वत रांगेत अत्यंत दुर्मीळ असलेल्या ‘मोठी पान लवंग’ (लुडविगीया पेरुवियाना) या वनस्पतीची नोंद झाली आहे. जळगावच्या इकरा एच. जे. थीम महाविद्यालयाचे प्रा. डॉ. तन्वीर खान यांनी या वनस्पतीची नोंद केली आहे. या दुर्मीळ वनस्पतीची महाराष्ट्रात पहिल्यांदाच नोंद झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी सातपुड्यातच ‘दुपर्णी चिरायता’ या वनस्पतीची नोंद केली होती.

‘मोठी पान लवंग’ या वनस्पतीचे शास्त्रीय नाव लुडविगीया पेरुवियाना असे आहे. जगात या वनस्पतीच्या ८२ तर भारतामध्ये ७ प्रजाती आढळतात. या वनस्पतीला पिवळ्या रंगाचे मोठे फुल असते. याची पाने लंबवर्तुळाकृती तर उंची साधारणपणे २ ते ३ मीटर इतकी असते. नदीकाठच्या आर्द्रयुक्त दलदलीच्या जागेवर ही वनस्पती आढळून येते.

१९५७ मध्ये भारतात पहिल्यांदाच नोंदया वनस्पतीची भारतात सर्वप्रथम नोंद १९५७ मध्ये चैन्नईमध्ये डॉ. फिचर यांनी केली. त्यानंतर डॉ. नायर यांनी १९७८ मध्ये केरळ व डॉ. बरवा यांनी १९९३ मध्ये आसाम या ठिकाणी या वनस्पतीची नोंद केली होती. डॉ. तन्वीर खान यांनी सातपुड्यातील दलदलयुक्त भागात या वनस्पतीची नोंद केली आहे. डॉ.खान यांनी तयार केलेला शोधनिंबध ‘इंडियन फॉरेस्टर’ या विज्ञान पत्रिकेला पाठविला असून, तो लवकरच प्रसिध्द होणार आहे.सातपुडा भागात स्वदेशी व विदेशी पक्ष्यांप्रमाणे वनस्पती देखील आढळून येतात. सातपुड्यात मोठ्या प्रमाणात जैवविविधता उपलब्ध आहे. अशा प्रकारच्या दुर्मीळ वनस्पतींचा ºहास होणार नाही याची शासन व वनविभागाने खबरदारी घ्यायला हवी. राज्यात पहिल्यांदाच या वनस्पतीची नोंद झाली आहे. -डॉ. तन्वीर खान, वनस्पती अभ्यासक, जळगाव.