शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

समृद्ध जीवनाची गृरुकिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 12:19 AM

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी जमीन, पाणी आणि शुद्ध हवेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पालघर जिल्ह्यात धामणी, सूर्या, वैतरणा, वांद्री, करवाळे, कुर्झे आदी धरणे असून सूर्या, पिंजाळ, वैतरणा, कवडास, तानसा आदी प्रमुख नद्या वाहत आहेत.

हितेन नाईक/अनिरुद्ध पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर/बोर्डी : पर्यावरणाचे रक्षण व संरक्षणासाठी जगभरात पर्यावरण दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी १९७२ मध्ये जागतिक पातळीवर पर्यावरणाबाबत राजकीय व सामाजिक प्रबोधन करण्याची घोषणा केली.

५ जून १९७४ पासून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येत असून पर्यावरण हीच समृद्ध जीवनाची गुरुकिल्ली मानली जाते. मात्र प्रत्येक वर्षी पर्यावरणाचे रक्षण करून ते टिकविण्याच्या दृष्टीने आणाभाका घेतल्या जात असल्या, तरी विकासाच्या नावाखाली जिल्ह्यात येऊ घातलेले प्रकल्प पर्यावरणाची राखरांगोळी करणार असल्याने जिल्ह्यात या प्रकल्पांना मोठा विरोध होत आहे.

मुंबईच्या नजीकच्या पालघर जिल्ह्यात पूर्वेला पश्चिम घाटाच्या पर्वतरांगा आणि पश्चिमेला सुमारे ११० किमी लांबीचा विस्तीर्ण सागरकिनारा लाभल्याने येथे समृद्ध पर्यावरणाचा प्रत्यय येतो. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र चार लाख ६९ हजार ६९९ हेक्टर आहे. जिल्ह्यातील डहाणू, पालघर, वसई आणि तलासरी या तालुक्यांतील एकूण वनांचे क्षेत्र (राखीव ७४१.४२ चौ.किमी./संरक्षित २६४.०० चौ.किमी. आणि संपादित ३३.१ चौ.किमी.) १०३८.५९ चौ.किमी. असून त्याची टक्केवारी ३५ आहे. वन विभागाकडून वृक्षारोपणाद्वारे हरित क्षेत्र वाढविण्याचे कार्य सुरू असून २०११ ते २०१९ या नऊ वर्षांच्या काळात ७७८१.५९ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे.

परंतु, केवळ संख्यात्मक वाढ, लाकूडचोरी व अवैध वाहतूक अशा विविध कारणांनी गुणात्मक परिणाम म्हणावा तेवढा दिसत नाही. पालघर, डहाणू व तलासरी येथे २८६३.७४१६ हेक्टर कांदळवनासाठी राखीव वनक्षेत्र अधिसूचित झाल्यानंतर महसूल विभागाकडून वन विभागाने २८४९.३७१ हेक्टर क्षेत्र ताब्यात घेतले आहे. परंतु समुद्रकिनाऱ्यालगत व खाजण परिसरातील या हिरव्या तटबंदीला बेकायदेशीररीत्या संपवण्याचा घाट घातला जात आहे.सन 2000 ची स्थिती1. पूर्वी घरं, गृहसंकुलांतील कचºयाची घरच्याघरी विल्हेवाट लावली जात होती. त्यामुळे कचºयाचा प्रश्न निर्माण होत नव्हता.2. तलाव, समुद्रकिनारे, पाणवठे, वनं मानवी हस्तक्षेपापासून दूर होती. त्यामुळे वनसंपदा मनमोहक वाटत होती.3. वृक्षारोपण कार्यक्रमातून पूर्वी झाडे वाढण्याचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे वनसंपदेत सातत्याने वाढ होताना दिसत होती.4. जिल्ह्यात धामणी, सूर्या, वैतरणा, वांद्री, करवाळे, कुर्झे आदी धरणे आहेत, मात्र या धरणांतील पाणी शहरांकडे वळवले आहे.5. पालघर जिल्हा हा निसर्गसंपदेने नटलेला आहे. डोंगर, नद्या, समुद्रकिनारा यामुळे येथील जीवन संपन्न होते.सध्याची स्थिती1. आता गावोगावी कचरा संकलन करून तो डम्पिंग केला जातो. मात्र त्याच्या योग्य व्यवस्थापनाअभावी ढिगारे निर्माण होत आहेत.2. आता पर्यटन आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीमुळे मानवी हस्तक्षेप वाढून समृद्धता लोप पावत आहे.3. आता लागवडीच्या संख्येत वाढ होत असली तरी झाडे जिवंत राहण्याचे प्रमाण मात्र खालावले आहे, ही चिंतेची बाब आहे.4. मुंबई तसेच वसई-विरार या शहरांकडे पाणी वळविल्याने ‘धरण उशाशी आणि कोरड घशाशी’ अशी अवस्था स्थानिक जनतेची आहे.5. आता जिल्ह्यातील तारापूर हे देशातील सर्वात प्रदूषण करणारे औद्योगिक क्षेत्र असल्याचे शासनाला जाहीर करावे लागले आहे.पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी...1. नागरिकांनी आपले दैनंदिन कर्बउत्सर्जन कमी करावे. त्यासाठी कर्बपदचिन्हे, जलपदचिन्हे, पर्यावरणीय पदचिन्हे समजून घेऊन कमीत कमी करून जगावे.2. आपले अन्न शक्यतो स्थानिक पातळीवरील विकत घ्यावे.3. वस्तू खरेदी करताना तिचा छुपा वा प्रत्यक्ष पर्यावरणावरकाय परिणाम होणार आहे, त्याचा विचार करावा आणि ती वस्तू घ्यायची की नाही, ते ठरवावे.4. पर्यावरणावर आणि कर्बउत्सर्जन कमी करण्यासाठी जागरूकपणे व्यक्त व्हा.5. पाणी किती अंतरावरून येते ते पाहावे. लांबून येत असेल, तर कर्बउत्सर्जन वाढते. पाण्याचा पुनर्वापर करणाऱ्यांना सवलत द्यावी आणि जे करीत नाहीत त्यांना शिक्षा व्हावी.6. निसर्ग आॅक्सिजन देतो. आपण निसर्गाला काय परत देतो, याचा विचार करा. भावी पिढीला आॅक्सिजन मुबलक मिळावा म्हणून झाडे लावा.7. शेतकरी, आदिवासी हे झाडांचे रक्षण करतात. त्यांना सरकारने अनुदान द्यावे. मग लोक झाडे जपतील.8. कोणताही प्रकल्प आणताना त्याचा तत्काळ होणारा फायदा न पाहता भविष्यातील आपत्तीवर विचार व्हावा.9. बायोडिझाइन तयार करून इमारती उभ्या राहिल्या, तर निसर्ग आपत्ती आणणार नाही.10. शहरे हरित करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. त्यासाठी सरकारने प्रोत्साहन द्यावे.