शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात आढळला अत्यंत दुर्मीळ कॅस्टोए कोरल स्नेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 18:47 IST

संदीप आडनाईक कोल्हापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे आढळणाऱ्या कॅस्टोए कोरल स्नेक ( Castoe’s coral snake) या अत्यंत दुर्मीळ सापाची ...

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात आढळला अत्यंत दुर्मीळ कॅस्टोए कोरल स्नेक आजरा तालुक्यात पहिली नोंद, सर्पतज्ज्ञांचे शिक्कामोर्तब

संदीप आडनाईककोल्हापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे आढळणाऱ्या कॅस्टोए कोरल स्नेक ( Castoe’s coral snake) या अत्यंत दुर्मीळ सापाची पहिली नोंद कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातून करण्यात आली आहे. या नव्या नोंदीमुळे या जिल्ह्यातील सापांच्या यादीत भर पडली असून सरिसृप तज्ज्ञ डॉ. वरद गिरी यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. या सापाच्या अधिवासामुळे आंबोली आणि आजरा परिसरातील समृद्ध जैवविविधता अधोरेखित झाली आहे.सातारा जिल्ह्यातील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. ओंकार यादव, शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी मयूर जाधव, स्वप्निल असोदे, सौरभ किनिंगे आणि शुभम कुरुंदवाडकर यांनी ही नोंद केली. ‘Reptiles and Amphibians’  या आंतराष्ट्रीय नियतकालिकामध्ये ही नोंद प्रसिद्ध झाली आहे.यापूर्वी या सापाची नोंद सरीसृप तज्ज्ञ डॉ. वरद गिरी व सहकाऱ्यांनी २०१३ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथून केली होती. त्यानंतर त्याचे वास्तव्य गोवा आणि कारवार (कर्नाटक) येथेही आढळले होते. २०२१ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात आजरा तालुक्यामधील होनेवाडी आणि मडिलगे या ठिकाणांवरून या सर्पाची नोंद झाल्याने याचा अधिवास समृद्ध ठिकाणी असल्याचे सिध्द झाले आहे. मडिलगे येथे हा सर्प प्रथम आढळला. त्यानंतर होनेवाडीमध्ये हा साप मृत अवस्थेत आढळला.या सापाची निरीक्षणे आणि छायाचित्रे सरीसृप तज्ज्ञ डॉ. वरद गिरी यांना पाठवण्यात आल्यानंतर त्यांनी हा साप कॅस्टोए कोरल स्नेक असल्याचे सांगितल्यानंतर यासंदर्भातील शोधनिबंध ‘Reptiles and Amphibians’  या आंतराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाला. 

प्रामुख्याने आंबोलीत आढळणारा हा साप अतिशय विषारी असून जमिनीखाली जास्त लोकसंख्येच्या ठिकाणी आढळतो. या सापाबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नसली तरी आशिया आणि अमेरिका खंडात केवळ ४०० प्रजाती आढळतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे तो साधारण तीन फूटापर्यंत आढळतो आणि त्याचा पोटाखालचा भाग लाल असतो. यामुळे आजरा आणि आंबोलीतील जैवविविधता अधोरेखित झाली आहे.- डॉ. वरद गिरी, सरीसृप तज्ज्ञ

टॅग्स :snakeसापenvironmentपर्यावरणAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशनkolhapurकोल्हापूर