शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
2
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
3
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
4
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
5
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
6
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
7
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
8
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
9
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
10
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
11
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
12
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
13
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
14
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
15
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
16
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
17
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
19
सावधान! 'हॅप्पी न्यू इयर' म्हणण्यापूर्वी १० वेळा विचार करा; एका क्लिकमुळे बँक खातं होईल रिकामं
20
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणीय जाणिवा वाढताहेत, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 00:45 IST

पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे, हे एक सत्य आहे. पण, सर्वांगीणदृष्ट्या ठाणे जिल्ह्याचा विकास करताना मात्र पर्यावरणाचे संतुलन बिघडलेले दिसते. म्हणूनच, गरज आहे ठाणेकरांनी वेळीच जागरूक होण्याची आणि आपापल्यापरीने पर्यावरणरक्षण करण्याची.

सुरेश लोखंडे / स्नेहा पावसकर ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबईला लागून असला तरी शहरी भागाबरोबरच आजही ग्रामीण जनजीवन असलेला जिल्हा म्हणजे ठाणे. या ना त्या कारणास्तव उद्भवणाऱ्या नैसर्गिक, कृत्रिम आपत्तींना जिल्ह्याला सामोरं जावं लागतं. पण, त्यासाठी गरज आहे ती जिल्ह्यातील पर्यावरणाचे संवर्धन करण्याची. जिल्ह्यातील लोकांच्या पर्यावरणविषयक जाणिवा गेल्या २० वर्षांत नक्कीच वाढल्या आहेत. पण, त्यादृष्टीने विचारपूर्वक नियोजन आणि कृती होणे मात्र आवश्यक आहे. 

समुद्रकिनारा, खाड्या, नद्या, डोंगररांगा, वनक्षेत्र, किल्ले याबरोबरच समृद्ध जैवविविधता ही ठाणे जिल्ह्याची खरी ओळख. जिल्ह्यात मागील २० वर्षांपूर्वी दोन हजार ८५७ स्क्वेअर किमी जंगल परिसर होता, म्हणजेच, २०.८९ टक्के. आता तो ३१.३७ टक्के इतका झाला आहे. जिल्ह्यातील खाडीकिनारी कांदळवन २० वर्षांपूर्वी ४७ स्क्वेअर किमी होते. आता ते ९०.६६ स्क्वेअर किमी इतके पसरले आहे. ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा वेग कमी करण्यात कांदळवन उपयुक्त ठरल्याचे डीसीएफ जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले. जिल्ह्यात गेल्या २० वर्षांत बरीच औद्योगिक क्रांती झाली. परिणामी, औद्योगिकीकरण, खाणकाम, जंगलतोड, कारखान्यांतून निघणारे सांडपाणी यामुळे वायू, ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात झाले. याचा परिणाम हवामानासह पर्जन्यवृष्टीवर झाला आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण खूप आहे. तरीही, पाणीटंचाई जाणवते. कारण, पावसाचे पाणी मुरण्यासाठी पुरेशी जागा नाही.

पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन केले पाहिजे, असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. संजय जोशी यांनी व्यक्त केले. तर, विकसित तंत्रज्ञान वापरून शेती केली तरी, पर्यावरणीय बदल त्यात मर्यादा घालत आहे. पावसाची सुरुवात वेळेवर, त्यानंतर खंड आणि पुन्हा मोठा पाऊस झाला, तरी परिपक्व पिकांचे सततच्या पावसाने नुकसान होते. हवामानाचा विचार करून शेती पिकाची रचना करावी, असे जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी सांगितले.

सन 2000 ची स्थिती1. जिल्ह्यात २० वर्षांपूर्वी ८६ दिवस पाऊस पडला होता. २०१० मध्येही तब्बल ११६ दिवस पाऊस पडला होता.2. ध्वनी, हवा प्रदूषण तेव्हाही मोजले जात असे. मात्र, ते मोजण्याचे अचूक तंत्र आणि यंत्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध नव्हते.3. शहरातील गटारांचे, ड्रेनेजचे, कंपन्यांमधील रासायनिक क्रिया झालेले पाणी सहज खाडीत सोडले जात होते.4. ठाणे खाडीच्या काठावर, दलदलीच्या ठिकाणी बगळे आणि अन्य काही पक्षी पाहायला मिळायचे.5. जिल्ह्यातील नद्या या वर्षभर प्रवाही असायच्या, तर दुसरीकडे हवेमध्ये धूलिकणांचे प्रमाण कमी होते.सध्याची स्थिती1. गेल्या वर्षी जिल्ह्यात तब्बल ११६ दिवस पाऊस पडला होता. या कमीअधिक पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसतो.2. ध्वनिप्रदूषण करणाºयांवर कारवाईचे न्यायालयीन आदेश २० वर्षांपूर्वी प्राप्त झाले. मोबाइलवर प्रदूषणाची तीव्रता मोजता येते.3. आता हे सांडपाणी खाडीत सोडायला महापालिकांना बंदी केली. अनेक इंडस्ट्रीज बंद झाल्या. त्यामुळे पाण्यातील गाळ कमी झाला.4. ठाणे खाडीत सोडले जाणारे सांडपाणी कमी झाले आणि खाडीत फ्लेमिंगो आणि इतर अनेक आकर्षक पक्षी येऊ लागले.5. नद्यांमध्ये गाळ वाढल्याने त्या आता वर्षभर वाहत नाही. वृक्षतोड, गाड्यांचा वाढता वापर यामुळे हवेतील धूलिकणाचे प्रमाण वाढले.पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी...अतुल देऊळगावकरपर्यावरणतज्ज्ञ1. नागरिकांनी आपले दैनंदिन कर्बउत्सर्जन कमी करावे. त्यासाठी कर्बपदचिन्हे, जलपदचिन्हे, पर्यावरणीय पदचिन्हे समजून घेऊन कमीतकमी करून जगावे.2. आपले अन्न शक्यतो स्थानिक पातळीवरील विकत घ्यावे.3. वस्तू खरेदी करताना तिचा छुपा वा प्रत्यक्ष पर्यावरणावरकाय परिणाम होणार आहे, त्याचा विचार करावा आणि ती वस्तू घ्यायची की नाही, ते ठरवावे.4. पर्यावरणावर आणि कार्बनउत्सर्जन कमी करण्यासाठी जागरूकपणे व्यक्त व्हा.5. पाणी किती अंतरावरून येते, ते पाहावे. लांबून येत असेल, तर कर्बउत्सर्जन वाढते. पाण्याचा पुनर्वापर करणाºयांना सवलत द्यावी आणि जे करीत नाहीत, त्यांना शिक्षा व्हावी.6. निसर्ग आॅक्सिजन देतो. आपण निसर्गाला काय परत देतो, याचा विचार करा. भावी पिढीला आॅक्सिजन मुबलक मिळावा म्हणून झाडे लावा.7. शेतकरी, आदिवासी हे झाडांचे रक्षण करतात. त्यांना सरकारने अनुदान द्यावे. मग, लोक झाडे जपतील.8. कोणताही प्रकल्प आणताना त्याचा तत्काळ होणारा फायदा न पाहता भविष्यातील आपत्तीवर विचार व्हावा.9. बायोडिझाइन तयार करून इमारती उभ्या राहिल्या, तर निसर्ग आपत्ती आणणार नाही.10. शहरे हरित करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. त्यासाठी सरकारने प्रोत्साहन द्यावे.