शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : महानगरांनी घेतला मोकळा श्वास; कोरोनाची आपत्ती प्रदूषण नियंत्रणात ठरली इष्टापत्ती

By गजानन दिवाण | Updated: April 15, 2020 13:39 IST

दिल्लीतील ‘सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट’ने केलेल्या पाहणीत ‘लॉकडाऊन’दरम्यान देशातील सर्वच महानगरांमधील प्रदूषण जवळपास ६१ टक्क्यांनी कमी नोंदविले गेले आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे देशातील सर्वच शहरांमधील स्थिती सुधारत आहे.लॉकडाऊनमुळे ही शहरे माणसांना श्वास घेण्यासारखी झाली आहेत.

- गजानन दिवाणऔरंगाबाद : ‘कोरोना’ची आपत्ती प्रदूषण नियंत्रणासाठी इष्टापत्ती ठरली आहे. कुठल्याच कायद्याने, प्रदूषणामुळे जाणाऱ्या मृत्यूच्या भीतीने वा आर्थिक नुकसानीमुळे जे होऊ शकले नाही, ते ‘कोरोना’मुळे झाले. विषारी वायूमध्ये जगणाऱ्या दिल्ली, मुंबईसह देशभरातील सर्वच महानगरांनी मोकळा श्वास घेतला. देशभरातील ‘लॉकडाऊन’मुळे सर्वच महानगरांतील प्रदूषण जवळपास ६१ टक्क्यांनी कमी झाले.

दिल्लीतील ‘सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट’ने केलेल्या पाहणीत ‘लॉकडाऊन’दरम्यान देशातील सर्वच महानगरांमधील प्रदूषण जवळपास ६१ टक्क्यांनी कमी नोंदविले गेले आहे. मुंबईत पीएम (पर्टिक्युलेट मॅटर) २.५ स्तर ६१ टक्के कमी नोंदविला गेला. दिल्लीत २६ टक्के, कोलकात्यात ६० टक्के, तर बंगळुरूमध्ये १२ टक्के कमी नोंद झाली.

जगभरातील ५० अति प्रदूषित शहरांमध्ये भारतातील २५ शहरे असल्याची नोंद गतवर्षी ‘आयक्यूएअर’ या स्वीसमधील संस्थेने केली होती. उद्योगांमुळे, वाहनांमुळे आणि कोळसा प्रकल्पांमुळेच भारतात प्रदूषण वाढत असल्याचे ‘आयक्यूएअर’ने म्हटले होते. आज लॉकडाऊनमुळे देशातील सर्वच शहरांमधील स्थिती सुधारत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या १३ एप्रिलच्या नोंदींनुसार नागपूर, भिवंडी, ठाणे, चंद्रपूर, आग्रा, दिल्ली, गुडगाव, गुवाहाटी,  इंदूर, पटणा या शहरांमधील प्रदूषणाची स्थिती सध्या सुधारत आहे. अहमदाबाद, भोपाळ, हैदराबाद, जयपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नाशिक, पुणे, सोलापूर या शहरांची स्थिती बरी आहे. अमृतसरमध्ये ठीक, तर बंगळुरू, लुधियाना, चेन्नई, औरंगाबाद आणि अमरावती या शहरांमधील प्रदूषणनियंत्रण चांगल्या स्थितीत आहे. मुंबईचा मार्च २०१९मध्ये एअर क्वालिटी इंडेक्स १५३ होता. म्हणजे आर्थिक राजधानी असलेले हे शहर माणसांना श्वास घेण्यायोग्य नव्हते. दिल्ली (एअर क्वालिटी इंडेक्स १६१)ची स्थिती तर यापेक्षा वाईट होती. लॉकडाऊनमुळे ही शहरे माणसांना श्वास घेण्यासारखी झाली आहेत.

- दिल्ली देशाची राजधानी दिल्लीत लॉकडाऊन आधीच्या तुलनेत पीएम १० चा स्तर ५१ टक्क्यांनी कमी, पीएम २.५ चा स्तर ४९ टक्क्यांनी, तर नायट्रोजन डायआॅक्साईड ३२ टक्क्यांनी कमी नोंदविले गेले आहे.

- मुंबईमहाराष्ट्राची राजधानी मुंबईत लॉकडाऊन आधीच्या तुलनेत पीएम १० चा स्तर ४९ टक्क्यांनी कमी, पीएम २.५ चा स्तर ४५ टक्क्यांनी, तर नायट्रोजन डायआॅक्साईड ६० टक्क्यांनी कमी नोंदविले गेले आहे.

- पुणेमहाराष्ट्रातील पुण्यात लॉकडाऊन आधीच्या तुलनेत पीएम १० चा स्तर ३२ टक्क्यांनी कमी, पीएम २.५ चा स्तर ३१ टक्क्यांनी, तर नायट्रोजन डायआॅक्साईड ३६ टक्क्यांनी कमी नोंदविले गेले आहे.

- अहमदाबादगुजरातमधील अहमदाबादेत लॉकडाऊन आधीच्या तुलनेत पीएम १० चा स्तर ४७ टक्क्यांनी कमी, पीएम २.५ चा स्तर ५७ टक्क्यांनी, तर नायट्रोजन डायआॅक्साईड ३२ टक्क्यांनी कमी नोंदविले गेले आहे.

स्रोत - शासनाची ‘सफर डॉट ट्रॉपमेट डॉट रेस डॉट इन’ वेबसाईट (ढोबळमानाने दोन प्रकारचे धूलिकण हवेत असतात. श्वसनामार्फत शरीरात जाणारे २.५ मायक्रोमीटरपेक्षा लहान असे पीएम २.५ कण आणि श्वसनातून शरीरात न जाणारे १० मायक्रोमीटरपेक्षा लहान पीएम १० कण.)

उद्या वाचा - रस्त्यांवरील आणि हवेतीलही ‘ट्राफिक’ कमी होणार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसenvironmentपर्यावरण