शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाने तयार केली बिया असलेली दिनदर्शिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 17:10 IST

environment forest Department kolhapur- कार्यालयात ठेवण्यासाठी हाताने बनवण्यात आलेल्या कागदाचा वापर करुन वन्यजीव विभागाने पर्यावरणस्नेही दिनदिर्शिका तयार केली असून यातील बियांचे कधीही वृक्षारोपण करण्यात येणार आहे. विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांच्या संकल्पनेतून ही दिनदर्शिका बनवण्यात आली असून यातून पर्यावरणाचा संदेशही देण्यात आला आहे.

ठळक मुद्देवन्यजीवच्या विशाल माळी यांची संकल्पनाहाताने बनवलेल्या कागदाचा वापर

कोल्हापूर : कार्यालयात ठेवण्यासाठी हाताने बनवण्यात आलेल्या कागदाचा वापर करुन वन्यजीव विभागाने पर्यावरणस्नेही दिनदिर्शिका तयार केली असून यातील बियांचे कधीही वृक्षारोपण करण्यात येणार आहे. विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांच्या संकल्पनेतून ही दिनदर्शिका बनवण्यात आली असून यातून पर्यावरणाचा संदेशही देण्यात आला आहे.दिनदर्शिकेच्या एका पानावर तीन महिने दर्शविले असून या प्रत्येक पानांमध्ये झेंडू, मिरची, कॉक्सकॉम्ब, ॲस्टर आणि बॅसिल या बियांचा समावेश आहे. महिना संपल्यानंतर ते पान फाडून जमिनीत त्याचे आहे तसेच रोपण करता येते. लवकर येणाऱ्या झाडांचा यात समावेश आहे.या वर्षाची दिनदर्शिका तयार करताना त्याद्वारे इंधन, पाणी आणि वीज वाचवण्याचाही संदेश देण्यात आला आहे. आणि सेंद्रिय खत निर्मिती करा, असा पर्यावरण संदेशही संदेश देण्यात आला आहे. या प्रत्येक पानावर त्या बियांची माहितीही देण्यात आली आहे. दिनदर्शिकेच्या मागील बाजूला त्याबाबत सूचना देण्यात आली आहे.महिना संपल्यानंतर संबंधित महिन्याचे पान हे मातीमध्ये घालून त्याला पाणी दिल्यास त्यापासून संबंधित बियांचे रोपात रूपांतर होणार आहे. या दिनदर्शिकेच्या माध्यमातून वन खात्याच्या वृक्षारोपण करा आणि पर्यावरण वाचवा असा संदेश देण्याचा प्रयत्न विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांनी केला आहे. 

टॅग्स :forest departmentवनविभागkolhapurकोल्हापूरenvironmentपर्यावरण