शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

सेक्सच्या विळख्यात कोवळे मन..! खेळण्या-बागडण्याच्या वयात अघटित घडतेय...

By संतोष आंधळे | Updated: December 18, 2022 10:25 IST

13 वर्षांची दोन मुले त्यांच्याच वर्गातील मुलीवर कुणी वर्गात नसल्याचे पाहून लैंगिक अत्याचार करतात, तर दुसऱ्या घटनेत 15 वर्षांचा मुलगा नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची गळा चिरून हत्या करतो. महामुंबईतील या दोन घटनांनी पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे...

संतोष आंधळे, विशेष प्रतिनिधीखेळण्या-बागडण्याच्या वयात मुलांना ‘सेक्स’चे आकर्षण वाटून अघटित घडल्याच्या घटना नुकत्याच घडल्या. बालवयातच डिजिटल साक्षर असलेल्या या पिढीबद्दल अनेक पालकांना कौतुकमिश्रित आश्चर्य वाटत असते. मात्र, आपल्या टेक्नोसॅव्ही पाल्याची ओढ  त्याला भलतीकडेच आकर्षित तर करत नाही ना, हे तपासून घेण्याची वेळ आली आहे. मुलांवर अविश्वास दाखवू नका, असे सांगितले जात असले, तरी त्यांना अतिस्वातंत्र्यही देऊ नका, हेही सांगणे तितकेच गरजेचे आहे.  १३ वर्षांची दोन मुले त्यांच्याच वर्गातील मुलीवर कुणी वर्गात नसल्याचे पाहून लैंगिक अत्याचार करतात, तर दुसऱ्या घटनेत  १५ वर्षांचा मुलगा नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची गळा चिरून हत्या करतो. महामुंबईतील या दोन घटनांनी पालकवर्गाला बुचकळ्यात टाकले आहे. या घटनेतील बाल गुन्हेगारांची पार्श्वभूमी कुठलीही असो. मात्र, या अशा पद्धतीचे विचार मुलांच्या मनात येऊ शकतात, ते या घटनांनी सिद्ध होते.

लहान वयातच मुलांच्या डोक्यात ‘गुन्हेगारी आणि सेक्स’ हे विषय कोण घुसवत असतील, तर त्याचे सोपे उत्तर म्हणजे मोबाइल. सध्या तर इंटरनेट डेटा चॉकलेटच्या किमतीत सहज उपलब्ध आहे. कुठे, कधी, काय पाहावे, हे मुले स्वत:च ठरवतात, सर्चमधील हिस्ट्री नष्ट करण्याचे ज्ञान ते सहज प्राप्त करतात. विशेष म्हणजे, हे लोण शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही पसरले आहे. मुलांमध्ये पॉर्न व्हिडीओ सर्रासपणे शेअर केले जात असल्याच्या धक्कादायक गोष्टी घडत आहेत. हे इतक्या कल्पकतेने केले जाते की, पालकांना याची भनकही लागत नाही. गुन्हे घडून त्यांना बालसुधारगृहात ठेवावे लागण्याच्या आधीच या गोष्टींना आळा घालण्यासाठी पालक, शिक्षक यांना एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे.  

संवाद खुंटलाय कोरोनाच्या काळात लहान मुले ५-६ तास स्क्रीनवर बसून होती. याचा भविष्यात त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होईल, याचा विचारच केला गेला नाही. त्याचप्रमाणे महत्त्वाचे म्हणजे, पालकांचा मुलांशी आणि मुलाचा पालकांशी संवाद तुटलाय. त्यासारखीच परिस्थिती म्हणजे,  शिक्षकांचा विद्यार्थ्यांबरोबर संवाद होत नाही. लैंगिक शिक्षण या विषयावर चर्चा घडू शकेल, असे पोषक वातावरण अजूनही तयार झालेले दिसून येत नाही. याकरिता एकमेव सध्या उपाय म्हणजे मोकळा संवाद होणे गरजेचे आहे, तो कुठेतरी खुंटलाय असे वाटते. - चिन्मयी सुमित, मराठी शाळा सदिच्छादूत आणि पालक

लैंगिक शिक्षणाची गरज सध्या ज्या पद्धतीने लहान मुलांच्या बाबतीत ज्या घटना आमच्याकडे येत आहेत, त्या सगळ्या घटना पाहता, शाळेत लहानपणापासूनच लैंगिक शिक्षणाची अत्यंत गरज असल्याचे दिसून आले आहे. गुड टच आणि बॅड टच पलीकडे जाऊन आता सेफ टच आणि अनसेफ टच अशा पद्धतीने मांडणी करण्याची गरज आहे. ९० टक्के प्रकरणात ओळखीचे लोक अत्याचार करत असल्याचे दिसून येत आहे. आमच्याकडे अशी अनेक मुलांची प्रकरणे आहेत. त्यामध्ये मुलांना पॉर्न साइट बघण्याचे आणि सेक्स चॅट करण्याचे व्यसन जडले आहे. पालकांना जर आपला मुलगा अशा पद्धतीने पॉर्न बघत असल्याचे कळले, तर त्यांना मारणे, ओरडणे यापेक्षा त्याला बसवून त्याचे दुष्परिणाम समजून सांगितले पाहिजे; परंतु खासगी डॉक्टरांच्या साहाय्याने या गोष्टी वेळेतच दाखवून त्यावर योग्य उपचार केले जाऊ शकतात.   सोनाली पाटणकर, संस्थापक, रिस्पॉन्सिबल नेटिझन्स 

टॅग्स :Educationशिक्षण