शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन दूतावासाकडून भारतीय विद्यार्थ्यांना मुलाखतीची वेळ देणे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 05:21 IST

विमान बुकिंग करताना युरोपमधील थांबा टाळण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : अमेरिकेचा भारतातील दूतावास जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जास्तीतजास्त विद्यार्थ्यांचे व्हिसा अर्ज विचारात घेत असून त्यांच्या प्रवासात काही अडचणी येणार नाहीत याला प्राधान्य देईल, असे दूतावासातील कॉन्सुलर कामकाजाचे मंत्री डॉन हेफ्लीन यांनी रविवारी मुलाखतीत म्हटले.

हेफ्लीन म्हणाले,“ दूतावासाचा हेतू हा एक जुलैपासून दोन महिन्यांच्या मुलाखती सुरू करण्याचा आहे. सोमवारपासून हजारो मुलाखती सुरू झाल्या आणि विद्यार्थ्यांना त्यांची अपाईंटमेंट बुक करण्यासाठी त्यांनी वेबसाईटवर लक्ष ठेवावे, असे सांगण्यात आले आहे. लवकर अपॉईंटमेंटचे फेरवेळापत्रक असणार नाही म्हणून विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करावा लागेल, असे स्पष्ट करून डॉन हेफ्लीन म्हणाले की, मेपासून रद्द झालेल्या अपॉईंटमेंटस या आपोआप रिशेड्यूल्ड होत नाहीत. 

उमेदवारांना पु्न्हा अर्ज मॅन्यूअली करावा लागेल. याशिवाय पालकांना विद्यार्थ्यांसोबत अमेरिकेत (बी वन,बी टू व्हिसा) येऊन त्यांची व्यवस्था लावण्यासाठी येण्याची परवानगी नाही. विद्यार्थ्यांना स्वत: प्रवास करावा लागेल. ज्या पालकांकडे आधीच बी वन, बी टू व्हिसा आहे त्यांना विमान प्रवासासाठी एनआईची गरज असेल. दूतावास अशा प्रकरणात कोणतीही एनआयई जारी करणार नाही. डिपेंडंटस (स्पाऊज, कुटुंबातील सदस्य) एफ वन व्हिसा धारकांसोबत प्रवासाची तयारी करीत असतील तर त्यांनाही एनआयईअंतर्गत वगळण्यात आले आहे, असेही हेफ्लीन  म्हणाले.

विद्यार्थ्यांना प्रवासाच्या ७२ तास आधी आरटी पीसीआर चाचणी करून घेणे गरजेचे आहे. सध्या क्वारंटाईनची गरज नाही. व्हॅक्सीनेशन ॲक्सेप्डेट एन्ट्रीबद्दल ते म्हणाले की,“सध्या लसीकरणाचे प्रकार हे पूर्णपणे त्या त्या शाळांवर अवलंबून आहेत. ते तुम्हाला स्वीकारू शकतात किंवा तुम्ही कॅम्पसवर पोहोचल्यानंतर लस घ्या असेही म्हटले जाऊ शकते.”डॉन हेफ्लीन म्हणाले की,“शाळांनी उपलब्ध केलेले इलेक्ट्रॉनिक आय२० दूतावासाने स्वीकारलेले आहे. विद्यार्थ्यांनी त्याची प्रिंट स्वत:सोबत ठेवणे आवश्यक आहे.

आर्थिक पुरावे मुलाखतीत दाखवण्याची गरज नाहीपूर्णपणे फंडेड विद्यार्थ्यांनी त्यांचे आर्थिक पुरावे व्हिसा मुलाखतीत दाखवण्याची गरज नाही. जर आय२० चा उल्लेख केलेला असेल तर तो पुरेसा आहे. वर्ग हे व्यक्तिश: असल्यामुळे विद्यापीठाकडून पत्राची गरज नाही. विद्यार्थ्यांनी युरोपमध्ये थांबा असलेले बुकिंग टाळावे कारण त्यांच्याकडे क्वारंटाईनची खूपच कठोर धोरणे आहेत, असेही त्यांनी मुद्दाम सूचवले.

टॅग्स :Americaअमेरिका