शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पाचवी-आठवीच्या तीन विषयांच्या दोनदा परीक्षा, उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच पुढील वर्गात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 13:14 IST

शासकीय, अनुदानित शाळांमध्ये तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रथम भाषा, इंग्रजी, गणिताकरिता संकलित मूल्यमापन चाचणी (२) घेतली जाणार आहे.

मुंबई : पाचवी-आठवीच्या विद्यार्थ्यांना यंदा प्रथम भाषा, इंग्रजी आणि गणित या तीन विषयांच्या केंद्रीय स्तरावरील संकलित मूल्यमापन आणि शाळा स्तरावरील वार्षिक अशा दोन्ही परीक्षा द्याव्या लागणार आहेत. यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.

शासकीय, अनुदानित शाळांमध्ये तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रथम भाषा, इंग्रजी, गणिताकरिता संकलित मूल्यमापन चाचणी (२) घेतली जाणार आहे. त्यातच यंदापासून या इयत्तांसाठी वार्षिक परीक्षाही होणार आहे. वार्षिक परीक्षा होणार असल्याने पाचवी-आठवीच्या विद्यार्थ्यांची संकलित चाचणी होणार की नाही, याबाबत संभ्रम होता. मात्र, शाळा स्तरावरील वार्षिक परीक्षेसोबतच संकलित मूल्यमापन चाचणीही विद्यार्थ्यांना द्यावी लागणार असल्याचे महाराष्ट्र मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी सांगितले.

एकत्रित निकालसंकलित मूल्यमापन चाचणी प्रथम भाषा, इंग्रजी आणि गणित विषयाची होणार आहे. पाचवी-आठवीकरिता मात्र शाळांना प्रथम भाषा, इंग्रजी आणि गणित या विषयांकरिता इतर विषयांप्रमाणे स्वतंत्र प्रश्नपत्रिका तयार करून एकत्रित निकाल तयार करायचा आहे. त्याच्या नमुना प्रश्नपत्रिका एससीईआरटीने दिलेल्या आहेत.

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षानिकालपत्र तयार करताना द्वितीय सत्राचेच संकलित गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. उत्तीर्णतेच्या नवीन निकषानुसार शाळांना निकाल तयार करायचा आहे. निकाल पत्रकामध्ये गुण दिले जाणार असल्याने श्रेणी लिहिण्याची आवश्यकता नाही. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घ्यावयाची आहे. अनुत्तीर्ण झाल्यास तो त्याच इयत्तेत राहील, असे स्पष्टीकरण एससीईआरटीने महाराष्ट्र मुख्याध्यापक महामंडळाला दिले आहे. 

टॅग्स :examपरीक्षा