शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

पूर्वीप्रमाणे सीईटी प्रवेशाच्या तीन फेऱ्या होणार, सीईटी सेलचा शासनाला प्रस्ताव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 08:46 IST

मंजुरीनंतर सर्व प्रवेशांचे वेळापत्रक दिले जाणार 

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून सीईटी सेलअंतर्गत विविध विभागांच्या प्रवेश प्रक्रियेत कपात करण्यात आली होती. त्यामुळे सीईटी सेलकडून तीन ऐवजी दोन प्रवेशाच्या फेऱ्या घेण्यात येत होत्या, आता यात बदल करून पूर्वीप्रमाणे प्रवेशाच्या तीन फेऱ्या केल्या जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव सीईटी सेलकडून सरकारकडे पाठवला असून मंजुरी मिळाल्यानंतर सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेशांचे वेळापत्रक दिले जाणार आहे.

राज्य सीईटी सेलने विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश फेऱ्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. फेऱ्या वाढल्याने त्याचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. या प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. विविध फेरीतून प्रवेश निश्चित करून जागा भरल्या जातात.

 कमी कालावधीत प्रवेशासाठी निर्णय      एमएचटी सीईटींतर्गत होत असलेले अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या प्रवेशाच्या तीन फेऱ्या गेल्या वर्षी घेण्यात आल्या होत्या.      मात्र, एकात्मिक तीन वर्षे अभ्यासक्रम, एमएड द्विवर्षीय पदव्युत्तर अभ्यासक्रम, बीपीएड द्विवर्षीय, विधी पाच वर्षे, विधी तीन वर्षे, एकात्मिक चार वर्षे, बीएड द्विवर्षीय सामान्य व विशेष, एमपीएड द्विवर्षीय पदव्युत्तर अशा अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेश फेऱ्या दोनच झाल्या होत्या.     कोरोनामुळे प्रवेश प्रक्रियांना आलेली कासवगती दूर करण्यासाठी आणि कमी कालावधीत हे प्रवेश पूर्ण करण्यासाठी सीईटी सेलने या पद्धतीने नियोजन केले आहे.

टॅग्स :examपरीक्षाGovernmentसरकार