शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अंमलबजावणीत बदल नाही; लाेकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 07:02 IST

नवी पद्धत २०२५ पासून लागू केल्यास सरावासाठी वेळ मिळेल, अशा प्रतिक्रिया उमेदवार देत आहेत. 

मुंबई : राज्यसेवा मुख्य परीक्षेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमातील बदलांची अंमलबजावणी २०२४-२५ पासून करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे. मात्र जाहीर केल्यानुसार २०२३ पासून अंमलबजावणीच्या निर्णयात कोणताही  बदल करण्याचा विचार नसल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गुरुवारी स्पष्ट केले. काही उमेदवार आणि संघटनांकडून या प्रकरणी करण्यात येणारी अवास्तव मागणी दबाव आणण्याचा प्रयत्न समजण्यात येईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा परीक्षेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमातील बदलांचीच अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षांपासून म्हणजे २०२३ पासून करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र त्या विरोधात राज्य सेवा परीक्षेच्या अनेक उमेदवारांनी नाराजी दर्शविली असून, ही पद्धती येत्या २०२४-२५ पासून लागू करण्याकडे ७६ टक्के उमेदवारांचा कल असल्याचे ऑनलाईन सर्वेक्षणातून दिसून आले. नवी पद्धत २०२५ पासून लागू केल्यास सरावासाठी वेळ मिळेल, अशा प्रतिक्रिया उमेदवार देत आहेत. 

उमेदवारांकडून काय सर्वेक्षण घेण्यात आले ?नवा अभ्यासक्रम आणि नवी परीक्षा योजना याबाबतचा कल जाणून घेण्यासाठी एमपीएससी स्टुडंट राइटतर्फे समाज माध्यमांद्वारे ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात आले. जवळपास १० हजारांहून अधिक उमेदवारांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन प्रतिसाद नोंदवला. प्रतिसाद नोंदवलेल्या उमेदवारांपैकी ७६ टक्के उमेदवारांचा कल २०२४-२५ पासून नवा अभ्यासक्रम आणि परीक्षा योजना लागू करण्याकडे असल्याचे दिसून आले, तर २४ टक्के उमेदवारांनी २०२३ पासूनच या बदलांची अंमलबजावणी व्हावे, असे मत नोंदवले.

आधीच्या अभ्यासाचे महत्त्व शून्य?मागील २ ते ३ मुख्य राज्यसेवा परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी आयोगाने लागलीच पुढील वर्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणी न करता आणखी २ ते ३ वर्षांनंतर तो लागू करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. नवीन पद्धती लागू केल्यास त्यांनी ज्या पद्धतीने आतापर्यंत अभ्यास केला त्या अभ्यासाचे महत्त्व शून्य होऊन आता नव्याने सुरुवात करावी लागेल आणि त्यामुळे त्यांना अपेक्षित यश मिळेलच, याची खात्री नसल्याची भीती ते व्यक्त करीत आहेत. त्यामुळे नवी परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रम २०२४-२५ पासून लागू केल्यास या बदलांना जुळवून घेण्यासाठी उमेदवारांना वेळ मिळेल, अशा प्रतिक्रिया उमेदवार देत आहेत.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा