शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फंडा कोचिंग क्लासच्या टेलिमार्केटिंगचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2023 08:50 IST

दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. अनेकांनी निकालाआधीच कोणत्या ना कोणत्या कोचिंग क्लासला प्रवेश घेऊन अकरावीची तयारीही सुरू केली असेल. दहावीची परीक्षा झाली रे झाली की कोचिंग क्लासकडून पालकांना संपर्क साधला जातो. तुमच्या पाल्यासाठी आमचा क्लास कसा योग्य आहे, हे सांगितले जाते.

विनय उपासनी, मुख्य उपसंपादक

दिवसभरात आपल्या मोबाइलवर कोणत्या ना कोणत्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वा अन्य कोणत्या तरी फायनान्स स्कीमविषयीचे कॉल्स येत असतात. सुरुवातीला हे कॉल अनवधानाने रिसिव्ह केले जातात. मात्र, नंतर त्याच मालिकेतील नंबरवरून कॉल येऊ लागले की त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करता येते. किंबहुना स्मार्टफोनच संबंधित नंबर हा ‘जंक कॉल’ असल्याचे सूचित करतो. तर अशा या डेबिट, क्रेडिट कॉल्सना सरावलेल्या कानांवर आता ‘तुमचा मुलगा दहावीला आहे ना सर. त्याला दहावीनंतर कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. विज्ञान शाखेसाठी आमची संस्था सर्वोत्तम आहे. तुम्ही आमच्या क्लास/कॉलेजला ॲडमिशन घ्या,’ असे आग्रहाचे निमंत्रण पडू लागले आहे.

दहावीची परीक्षा आटोपल्यानंतर विद्यार्थी आणि पालक जरा कुठे सुटकेचा नि:श्वास टाकत नाहीत, तोच साधारणत: आठवडाभरातच पालकांचे मोबाइल खणखणू लागतात. मुलगा/मुलगी दहावीला आहे. त्याच्या करिअरचा विचार केला आहे का. त्याला कशात रुची आहे. भविष्यात त्याला काय शिकायचे आहे वगैरे प्रश्न विचारून आमच्या कोचिंग क्लासच्या अमक्या दिवशी होणाऱ्या सेमिनार वा वर्कशॉपला पाल्यासह हजर राहा, असे सांगितले जाते. सुरुवातीला कानांना हे बरं वाटतं. मात्र, हळूहळू या कॉल्सची संख्या वाढत जाते. दिवसभरातून एक वा दोनदा येणाऱ्या कॉल्सची संख्या पाच- सहावर पोहोचते. वेगवेगळे कोचिंग क्लासेस, त्यांचे शुल्कांचे वेगवेगळे पॅकेज आणि वेगवेगळ्या वैशिष्ट्यांची यादी आपल्यासमोर सादर होऊ लागते. त्यातून तुम्ही पाल्यासाठी योग्य ती निवड करायची असते. ॲडमिशनचे निकालानंतर पाहू काय ते, असे उत्तर दिले तर तुम्हाला तोपर्यंत उशीर झालेला असेल, वगैरे सांगून भीतीही घातली जाते.

डेटा मिळतो कुठून?

- अचानक एवढ्या साऱ्या कोचिंग क्लासचे वा निवडक कॉलेजांचे आपल्याला फोन कसे काय येऊ लागले, आपण तर यांच्याकडे कधी विचारणा केली नव्हती, वगैरे सहजसोपे प्रश्न पालकांना पडतात. -  मात्र, सध्याचे युग डेटाचे आहे. ज्याच्याकडे जास्त डेटा तो सर्वात श्रीमंत - थोडक्यात डेटा इज न्यू ऑइल - असे म्हटले जाते.-  साहजिकच कोचिंग क्लास वा कॉलेजेसकडे हजारो विद्यार्थ्यांचा डेटा सहजी उपलब्ध असतो. त्यासाठी काही एजन्सी काम करत असतात. -  या एजन्सींकडून विद्यार्थ्यांचा डेटा रीतसर विकत घेतला जातो, हा एक मार्ग किंवा शाळांकडून वा दहावीचे कोचिंग क्लास चालविणाऱ्यांकडून हा डेटा उपलब्ध केला जातो, हा दुसरा मार्ग.

पाल्याचा कल ओळखा...

डेटाच्या उपलब्धतेनंतर सुरू होते टेलिमार्केटिंग. मात्र, केवळ टेलिमार्केटिंगला किंवा त्यांच्या ऑफर्सना भुलून घाईने निर्णय न घेतलेलाच बरा. कारण येथे मुलाच्या भविष्य निश्चितीचा प्रश्न आहे. त्यामुळे कोणत्याही क्लास वा कॉलेजला ॲडमिशन घेण्याआधी मुलाचा कल कोणत्या ज्ञान शाखेकडे आहे, याची तपासणी करून घेणे केव्हाही योग्य, अशी स्पष्टता असेल तर टेलिमार्केटिंगवरून कितीही भूलभुलैया योजना सांगितल्या गेल्या तरी तुमचा निर्णय चुकणार नाही. अखेरीस चॉइस इज युअर्स...

कोचिंग क्लासकडून केले जाणारे टेलिमार्केटिंग हे पालकांच्या मनावरील गारूड आणि भीती यांना खतपाणी घालण्याचे काम आहे. विशिष्ट परीक्षांमध्ये यश मिळवलं तरच करिअर घडू शकतं, असं त्यातून भासवलं जातं. मात्र, पालकांनी सारासार विचार करून तसेच आपल्या पाल्याचा कल ओळखून या प्रकाराकडे पाहायला हवे. क्लासेसच्या टेलिमार्केटिंग पद्धतीला न भुलता त्यावर योग्य विचारमंथन करून पाल्याच्या करिअरची दिशा ठरवणे उचित ठरते. - किशोर दरक, शिक्षण शास्त्राचे अभ्यासक.

 

टॅग्स :Educationशिक्षण