शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

शिक्षक, पालकांनो, सावधान! विद्यार्थ्यांना ‘चॅट-जीपीटी’ची चटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 08:26 IST

वैचारिक क्षमतेवर परिणाम होण्याची भीती!

- नम्रता फडणीसलोकमत न्यूज नेटवर्कपुणे :  हल्लीच्या पिढीला बुद्धीला ताण न देता सगळंच ‘इन्स्टंट’ हवंय. त्यामुळेच अनेक देशांमध्ये बंदी असलेल्या ‘चॅट-जीपीटी’चा भारतात अधिक वापर हाेताना दिसत आहे. अगदी पुण्यातील काही शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थीही प्रोजेक्ट किंवा शैक्षणिक गोष्टींसाठी ‘चॅट-जीपीटी’चा वापर करतात. या कृत्रिम तंत्रज्ञानाने विद्यार्थ्यांच्या वैचारिक क्षमतेवर परिणाम होण्याची भीती शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. चॅट -जीपीटी हे फक्त एक लर्निंग मॉडेलसारखे आहे. ते फक्त फीड डेटाच्या आधारेच प्रतिसाद देते. त्यामुळे वैचारिक क्षमतेवर परिणाम हाेण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

फायदे अन् धाेके?  गुगलच्याच धर्तीवर ‘एआय’ने (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) ‘चॅट-जीपीटी’ हे तंत्रज्ञान विकसित केल्याने कामे कमी वेळेत होत आहेत. हे वरदान वाटत असले तरी याने अनेकांच्या नोकऱ्याही धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.    या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना होणारे फायदे सांगितले जात आहेत. उदा. जटिल प्रश्नांची उत्तरे सहज मिळू शकतात. त्यांची कार्यक्षमता वाढीस लागू शकते. परंतु, याचा बौद्धिक क्षमतेवरदेखील परिणाम होऊ शकतो.

चॅट -जीपीटी म्हणजे काय? चॅट-जीपीटी एआयने विकसित केलेले नैसर्गिक भाषा प्रक्रिया मॉडेल आहे, जे सर्च बॉक्समध्ये लिहिलेले शब्द समजून घेऊन लेख, बातम्या, मुलाखतीसाठी प्रश्न आदी फॉरमॅटमध्ये उत्तर देऊ शकते. ई-मेल, निबंध कसे असावेत, यासाठीही ‘चॅट-जीपीटी’चा वापर केला जाऊ शकतो.

तुलनेत फरकगुगल मागितलेली माहिती शोधण्यात मदत करण्यासाठी वेब पृष्ठे अनुक्रमित करते, तर चॅट-जीपीटीमध्ये प्रशिक्षण डेटामधून शिकलेल्या माहितीचा वापर होतो. चॅट-जीपीटी फक्त २०२१ पर्यंतची माहिती देऊ शकते. 

या देशांनी घातली बंदीअधिक डेटा वापरला जाईल व गैरवापराच्या भीतीने या तंत्रज्ञानावर आधी इटलीने बंदी घातली. त्यानंतर चीन, नॉर्थ कोरिया, सिरीया, क्यूबा, इराण आणि रशियानेही यावर बंदी घातली.