शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

खासगी आयटीआयला विद्यार्थ्यांचे प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2022 10:42 IST

पहिल्या फेरीत ४० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर पहिल्या फेरीत राज्यातून ४० हजार ७१० प्रवेश निश्चित झाले आहेत. पहिल्या फेरीत आयटीआय प्रवेशासाठी एकूण ९२ हजार १४० जागा अलॉट झाल्या होत्या, त्यापैकी ४४ टक्के विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशाची निश्चिती केल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व संचालनालयाकडून देण्यात आली आहे. यामध्ये खासगी आयटीआयचे ५६ टक्के तर शासकीय आयटीआयचे ४१ टक्के प्रवेश झाले आहेत.

आयटीआयच्या पहिल्या फेरीत झालेल्या प्रवेशांमध्ये मुंबई विभागात सर्वाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशाची निश्चिती केली आहे. मुंबईमधील प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रमाण ५३.७५ टक्के इतके आहे. त्यानंतर नागपूर येथील ४८.५३ टक्के विद्यार्थ्यांनी, नाशिक विभागातील ५४६.५२ टक्के विद्यार्थ्यांनी आणि पुणे विभागातील ४५. ९७ टक्के विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. सर्वात कमी प्रवेशाची निश्चिती औरंगाबाद विभागातून झाली (३४ टक्के) आहे.

खासगी प्रवेशाची टक्केवारी ५६.५२%  आयटीआय पहिल्या फेरीत शासकीय आयटीआयमधील ७५,७९९ जागा विद्यार्थ्यांना अलॉट झाल्या होत्या त्यापैकी विद्यार्थ्यांनी ३१,४७३ जागांवर प्रवेश निश्चित केले आहेत. 

याशिवाय खासगी आयटीमधील १६ हजार ३४१ जागांवर प्रवेश अलॉट करण्यात आले होते, त्यापैकी विद्यार्थ्यांनी 

९,२३७ जागांवर प्रवेश निश्चित केले आहेत. 

प्रवेश निश्चिती दरम्यान विद्यार्थ्यांनी शासकीय आयटीआयपेक्षा खासगी आयटीआयला जास्त प्राधान्य दिले आहे. शासकीय आयटीआयची प्रवेशाची टक्केवारी ४१.५२% असून खासगी आयटीआयची प्रवेशाची टक्केवारी ५६.५२ टक्के आहे. 

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेज