शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात शाळांना ५ दिवस सुट्टी हवीच! विद्यार्थी संघटनांची मागणी; शाळांनी परीक्षा न घेण्याचा आग्रह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 05:45 IST

दोन वर्षांच्या कालावधीनंतर कोरोना महामारीचे संकट दूर झाल्यामुळे शासनाने हटविलेल्या निर्बंधांमुळे यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

मुंबई :

दोन वर्षांच्या कालावधीनंतर कोरोना महामारीचे संकट दूर झाल्यामुळे शासनाने हटविलेल्या निर्बंधांमुळे यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवात सर्व शाळा व महाविद्यालयांना ५ दिवस सुट्टी जाहीर करावी तसेच या काळात कोणत्याही परीक्षा अथवा प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येऊ नये अशाप्रकारच्या सूचना सर्व शाळांच्या व्यवस्थापनांना करण्याची मागणी अनेक विद्यार्थी संघटनांनी शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे. 

मुंबईतील उपसंचालक विभागाकडे यासंदर्भातील अनेक निवेदने आल्याने मुंबई उपसंचालक संदीप संगवे यांनी तत्काळ सर्व शाळांना उत्सवकाळात सुट्ट्यांबाबत शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात येतील असे स्पष्ट केले आहे. गणेशोत्सवासाठी ठाणे, मुंबई परिसरातील पालक-विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोकणासह राज्यातील आपल्या गावी जात असतात. मात्र, या दरम्यान कॉन्व्हेन्ट शाळा जाणूनबुजून शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतात. शाळांना पाच दिवसांची सुट्टी दिली जाते, परंतु परतीच्या प्रवासाला गर्दी होत असल्यामुळे तातडीने परतणे शक्य होत नाही. त्यामुळे तेव्हा कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेऊ नयेत, असे निवेदन युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर आणि शीतल शेठ देवरुखकर यांनी शिक्षण उपसंचालक  संदीप संगवे यांना दिले. यावर कार्यवाहीचे निर्देश देऊन परीक्षा न घेण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सावंत यांनी दिली. यासंदर्भातील निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना प्रमुख संघटक चेतन पेडणेकर यांनीही दिले आहे.

अकरावी प्रवेशाची प्रक्रिया पुढे ढकला   अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा स्पेशल राऊंड गणेशोत्सवानंतर सुरू करा, या मागणीसाठी शिक्षक भारतीकडून शिक्षण संचालकांना पत्र पाठविले आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे. शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य यांच्या परिपत्रकानुसार अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा स्पेशल राऊंड १ चे प्रवेश दिनांक ३० ऑगस्टपासून २ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांनी पूर्ण करावेत, असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा स्पेशल राऊंड गणेशोत्सवानंतर होणे आवश्यक आहे, असे सुभाष मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव