शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Super Exclusive: शिष्यवृत्तीचा तिढा अखेर सुटला, ३६४ कोटींची रक्कम लवकरच ३.२२ लाख विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 08:42 IST

शिष्यवृत्ती संदर्भातील नोडल एजन्सीबाबत वित्त विभागाने काही त्रुटी व आक्षेप नाेंदविले होते. त्यामुळे २०२१-२२, २०२०-२१ मधील राज्यातील ३ लाख २२ हजार विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा तिढा निर्माण झाला होता.

राजेश मडावीचंद्रपूर :शिष्यवृत्ती संदर्भातील नोडल एजन्सीबाबत वित्त विभागाने काही त्रुटी व आक्षेप नाेंदविले होते. त्यामुळे २०२१-२२, २०२०-२१ मधील राज्यातील ३ लाख २२ हजार विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा तिढा निर्माण झाला होता. सरकारने नुकतेच हे आक्षेप दूर केल्याने, ३६४ कोटींची रक्कम मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे.केंद्र शासन पुरस्कृत योजनेंतर्गत राज्यांना दिला जाणारा शिष्यवृत्तीचा निधी संबंधित राज्यांनी स्टेट नोडल एजन्सीद्वारे वितरित करावा, अशा मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारच्या वित्त विभागाने जारी केल्या. त्याप्रमाणे, महाराष्ट्रातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत ६० टक्के निधी डीबीटीच्या माध्यमातून थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. परंतु राज्य सरकारच्या  ४० टक्के निधीअभावी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला अडथळे निर्माण झाले. विशेष म्हणजे, आर्थिक वर्ष संपायला केवळ एक आठवडा राहिला असताना, राज्याच्या वाट्याच्या मंजुरी आणि सुधारित वितरणाबाबत वित्त विभागाने आक्षेप नोंदविल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला होता. 

दरम्यान, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन समाजकल्याण आयुक्तांनी केंद्र शासनातील सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, तसेच केंद्र शासनातील वित्त विभागाकडे गांभीर्याने पाठपुरावा केला. परिणामी, केंद्रीय सामाजिक न्याय व वित्त विभागाचे केंद्रीय सहसचिव व संंबंधित यंत्रणांनी महाराष्ट्रातील शिष्यवृत्तीची समस्या दूर केली आहे. 

राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील सन २०२१-२२ व २०२०-२१ मधील सुमारे ३ लाख २२ हजार विद्यार्थ्यांच्या ३६४ कोटींचा प्रश्न मार्गी लागला. यासाठी समाजकल्याण विभागाने सातत्याने पाठपुरावा केला. शिष्यवृत्तीची रक्कम मंजूर झाली असून, विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.- डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाजकल्याण विभाग.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रScholarshipशिष्यवृत्ती