शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

डीम्ड युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांनाही स्कॉलरशिप

By सीमा महांगडे | Updated: February 28, 2023 07:04 IST

उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मोठा दिलासा, अभिमत विद्यापीठांना सूचना

- सीमा महांगडे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्याची प्रचलित राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप मिळू शकणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आला असून, त्यासंदर्भात काय आणि कशी कार्यवाही करावी, याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत राज्य सरकार निधीचा अभाव असल्याचे कारण पुढे करत अभिमत विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाकारत होते. 

राज्यात २१ अभिमत विद्यापीठे आहेत. या विद्यापीठांमध्ये व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळणार आहे.  आतापर्यंत शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना राज्यातील अभिमत विद्यापीठात शिकणाऱ्यांना लागू नव्हती. याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करावी, असा आदेश दिला होता. त्यानुसार उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील अभिमत विद्यापीठे, त्यांचे अभ्यासक्रम, सामाजिक संवर्गनिहाय विद्यार्थी क्षमता, यासाठी एक सूत्र लागू करण्यासाठी एक त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. दरम्यान, या समितीच्या अहवालातील २ शिफारशी मान्य करीत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून शिष्यवृत्तीच्या अंदाजे ११८ कोटी रुपयांच्या शुल्क प्रतिपूर्तीला मान्यता दिली आहे. 

  काय आहेत सूचना ?       युजीसीच्या अभिमत विद्यापीठांच्या नियमावलीप्रमाणे अभिमत विद्यापीठांनी त्यांचे अभ्यासक्रम, शिक्षण शुल्क व प्रवेशित विद्यार्थी यांची माहिती राज्य शासनाच्या विभागांना देणे बंधनकारक आहे.      अभिमत विद्यापीठांनी त्यांच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती संबंधित संचालनालयांना देणे बंधनकारक.      अभिमत विद्यापीठांनी त्यांच्या अखत्यारितील महाविद्यालये, संस्था, शुल्क, माहितीपुस्तिका हे सारे संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवश्यक.   याशिवाय अभिमत विद्यापीठांनी त्यांचे निशी, लेखापरीक्षण, वार्षिक अहवाल याचा लेखाजोखा तयार ठेवून अँटीरॅगिंग इ बाबत व्यवस्था कक्ष ही स्थापित करण्याची कार्यवाही करावी 

टॅग्स :universityविद्यापीठ