शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

एलएलएम विधी अभ्यासक्रम मान्यतेच्या प्रस्तावात घोटाळे? मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची काँग्रेसची मागणी

By मनोहर कुंभेजकर | Updated: August 18, 2022 19:44 IST

Congress News: 2022- 23 साठी नवीन अभ्यासक्रम प्रस्ताव मानण्यासाठी शासनाकडे सादर केले गेले होते. त्या प्रस्तावांच्या मान्यतेमध्ये प्रचंड मनमानी झाल्याची तक्रार महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते धनंजय जुन्नरकर यांनी केली आहे.

- मनोहर कुंभेजकरमुंबई -एल. एल. एम. विधी अभ्यासक्रम सुरू करावयाचा असल्यास सदर महाविद्यालायकडे "नॅक"  मानांकन असणे आवश्यक असते.जर नॅक चे मानांकन नसेल तर उच्च व तंत्र शिक्षण विभाग त्या प्रस्तावात ती त्रुटी दाखवतात व त्रूटीची पूर्तता 1 वर्षाच्या आत करण्याचा शेरा देऊन सदर महावियद्यालयाला मान्यता देतात.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 आणि संदर्भातील 13/9/ 2017 च्या शासन निर्णयान्वित केलेल्या कार्यपद्धतीनुसार 2022- 23 साठी नवीन अभ्यासक्रम प्रस्ताव मानण्यासाठी शासनाकडे सादर केले गेले होते. त्या प्रस्तावांच्या मान्यतेमध्ये प्रचंड मनमानी झाल्याची तक्रार महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते धनंजय जुन्नरकर यांनी केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार व महाविद्यालयांनी नाव न देण्याचा अटीवर सांगितल्या नुसार छाननी करणाऱ्यांनी मनमानी करून काही महाविद्यालयांना जाणीवपूर्वक  नॅक ची कमतरता दाखवून प्रस्ताव नाकारले आहेत.एका महाविद्यालयाला एक न्याय व एका महाविद्यालयाला दुसरा न्याय देण्याचे भेदभाव पूर्ण वर्तन सदर विभागाकडून झालेले आहे. हे वर्तन चुकीने झालेले नसून ह्यात विषेश " अर्थ " दडलेला आहे अशी टीका त्यांनी केली.

न्याय , कायदा शिकविल्या जाणाऱ्या महाविद्यालयांना शासकीय अधिकारी जर भेदभाव करत असतील मनमानी करत असतील तर सदर विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी देखील जुन्नरकर यांनी केली आहे. सर्व महाविद्यालयाना समान न्याय न दिल्यास माननीय उच्च न्यायालयात पिटीशन दाखल करून सर्व प्रक्रिया रद्द करण्यासाठी काँग्रेस च्या विधी विभागातील वरिष्ठांना सांगण्यात आल्याचे कळते. 

टॅग्स :Educationशिक्षण