शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठात होणार आंबेडकर, शाहू महाराजांवर संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 06:16 IST

घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात वारंवार पत्रसंवाद व्हायचा.

मुंबई :

घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात वारंवार पत्रसंवाद व्हायचा. उभयतांमध्ये प्रगाढ मैत्रीही होती. शाहू महाराजांनी आंबेडकरांची मुंबईतील निवासस्थानी घेतलेली भेट आणि माणगाव परिषदेत आंबेडकरांचा शाहू महाराजांनी केलेला सन्मान या सर्व पार्श्वभूमीवर या दोन्ही महनीय व्यक्तींबाबत संशोधन होणे गरजेचे असून, दोन्ही विद्यापीठे हे काम संयुक्तरीत्या करतील, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी दिली.

मुंबई विद्यापीठामध्ये  ८ ते १४ एप्रिलदरम्यान महात्मा जोतिराव फुले व बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने उभयतांवरील दुर्मीळ पुस्तकांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने बोलताना कुलगुरूंनी वरील माहिती दिली. मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र व शिवाजी विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र यांच्यात संयुक्तरीत्या विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतील, असेही कुलगुरूंनी नमूद केले. 

ग्रंथप्रदर्शनात ४०० हून अधिक पुस्तके, दुर्मीळ लेख, साहित्य, महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा, रविवार, ३ एप्रिल १९२७ चा बहिष्कृत भारत पाक्षिकाचा पहिला अंक, मूकनायक, जनता साप्ताहिकाचे ऑक्टोबर १९५६ चे हिरक महोत्सवी विशेषांक, एन्साक्लोपीडिया ऑन आंबेडकर, आंबेडकर ऑन पॉप्युलेशन पॉलिसी, चॅम्पियन ऑफ ह्युमन राइट्स, एन्साक्लोपीडिया ऑफ दलित एथनॉग्राफी, द आंबेडकर एरा, महात्मा फुले गौरवग्रंथ अशा विविध ग्रंथांचा समावेश आहे. सांताक्रूझ पूर्व येथील मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरीतील पंडित जवाहरलाल नेहरू ग्रंथालयात सकाळी १० ते दुपारी ५ या वेळेत सात दिवस चालणारे हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठ