शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर फार्मसी प्रवेशाला सुरुवात; २० जुलैपर्यंत अर्ज करण्याची संधी, सीईटीकडून वेळापत्रक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 08:48 IST

हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, डी. फार्म आणि सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी या डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या  प्रवेशासाठी अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना मुदतवाढ दिली आहे.

मुंबई : सीईटीच्या निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत असलेली औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रममधील चार वर्षांचा बी. फार्म. (बॅचलर ऑफ फार्मसी) आणि सहा वर्षांचा फार्म. डी. (डॉक्टर ऑफ फार्मसी) या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलने मंगळवारपासून सुरू केली आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत २० जुलैपर्यंत आहे.

‘फार्मसी’ क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या विविध व्यवसायांना मागणी वाढल्याने आणि रोजगारांच्या विविध संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याने पदविका आणि पदवी फार्मसी अभ्यासक्रमांना मागणी आहे. यंदाचे प्रवेश अद्याप सुरू झालेले नव्हते. यामुळे विद्यार्थ्यांची प्रतीक्षा होती. अखेर सीईटी सेलने मंगळवारी प्रवेशाची अधिसूचना जारी करत प्रवेशफेरीसह वेळापत्रक जाहीर केले आहे.

यंदा २० जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदणी करता येणार आहे. २३ जुलैला संभाव्य गुणवत्ता यादी जाहीर होणार असून या यादीतील त्रूटीबाबत २६ जुलै अखेर तक्रार करण्याची मुदत आहे. २८ जुलैला  पक्की गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.  त्याच दिवशीही जागांचे तपशील जाहीर होणार आहेत. तर तीन प्रवेश फेरी होणार आहेत.  १४ ऑगस्टपासून वर्ग सुरू होणार आहेत.

डी. फार्म, हॉटेल मॅनेजमेंटच्या पदविका अर्ज करण्यास मुदतवाढहॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, डी. फार्म आणि सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी या डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या  प्रवेशासाठी अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना मुदतवाढ दिली आहे. आता विद्यार्थ्यांना २४ जुलैपर्यंत अर्ज सादर करता येतील. तंत्रशिक्षण संचालनालयाने १२ जूनपासून हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, डी. फार्म आणि सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्याची मुदत ३ जुलैला संपली. 

असे असेल प्रवेशाचे वेळापत्रकऑनलाईन अर्ज : २० जुलैपर्यंतकागदपत्रांची पडताळणी : २० जुलै (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)पक्की गुणवत्ता यादी : २८ जुलैपहिल्या कॅपसाठी पसंतीक्रम : २९ ते ३१ जुलैपहिली प्रवेशाची यादी : २ ऑगस्टप्रवेश कन्फर्म करणे :३ ते ५ ऑगस्ट(सविस्तर वेळापत्रक सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळावर )