शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सवलतीच्या गुणांसाठी ५० नव्हे २५ रुपये भरा; विद्यार्थी-पालकांच्या विरोधानंतर मंडळाने केली कपात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 06:05 IST

कला व क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीच्या बळावर दहावीत सवलतीचे गुण दिले जातात.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहावी, बारावीच्या राज्य शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये कला, क्रीडाच्या सवलतीच्या अतिरिक्त गुणांसाठी प्रत्येकी ५० रुपये शुल्क मंडळामार्फत आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयाला विविध क्रीडा संघटना, पालक आणि विद्यार्थ्यांकडून प्रचंड विरोध झाला. या पार्श्वभूमीवर विद्यार्थीहित लक्षात घेऊन शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला, तसेच खेळाडू, एन.सी.सी., स्काउट व गाईड प्रकाराच्या प्रस्तावांच्या छाननीसाठी आता प्रती विद्यार्थी ५० ऐवजी २५ रुपये छाननी शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे.  ही कार्यवाही मार्च-२०२३ च्या परीक्षेपासून अमलात आणावी, अशा सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केली आहे.

कला व क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीच्या बळावर दहावीत सवलतीचे गुण दिले जातात. या गुणांनी यंदाही निकालाचा टक्का वाढविण्यास हातभार लावत असल्याने विद्यार्थ्यांसाठी हे गुण महत्त्वाचे असतात. त्यामुळे  विद्यार्थी सवलतीच्या अतिरिक्त गुणांसाठी शाळा, शिक्षणाधिकारी किंवा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव दाखल करतात. मात्र, यावर्षीपासून विद्यार्थ्यांना या गुणांसाठी पैसे मोजावे लागणार असून प्रस्ताव दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक कला प्रकारासाठी ५० रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याचा निर्णय मंडळाने जाहीर केला होता. दरम्यान, पालक आणि विद्यार्थ्यांकडून या निर्णयाला विरोध होत आहे. शाळांनी छाननी शुल्क म्हणून प्रस्ताव स्विकारत असताना विभागीय मंडळाच्या नावे चलनाद्वारे किंवा रोखीने भरणा करून स्विकारावेत. 

छाननी शुल्क कशासाठी? कला, क्रीडा विषयातील अतिरिक्त गुणांसाठी खेळाडू विद्यार्थी मंडळाकडे प्रस्ताव दाखल करतात. या प्रस्तावामध्ये त्रुटी असल्यामुळे संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करावा लागतो.  कला, क्रीडा प्रकारात सहभागी विद्यार्थ्यांच्या प्रस्तावाची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे त्रुटींची पूर्तता करण्यासाठी जादाचे कर्मचारी विभागीय मंडळस्तरावर घ्यावे लागतात.  यासाठी वेळ, श्रम आदींचा विचार करता प्रतिविद्यार्थी २५ रुपये छाननी शुल्क आकारण्यात येणार आहे.

टॅग्स :universityविद्यापीठ