शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 11:28 IST

आयटीआयसाठी १ लाख ४७ हजार ४३२ जागांची प्रवेशक्षमता उपलब्ध होती. दुसऱ्या फेरीतही अल्प प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. 

मुंबई : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) २०२५ या शैक्षणिक वर्षासाठी दोन फेऱ्यांमध्ये केवळ ५० हजार ५६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. आयटीआयसाठी १ लाख ४७ हजार ४३२ जागांची प्रवेशक्षमता उपलब्ध होती.  दुसऱ्या फेरीतही अल्प प्रतिसाद असल्याचे चित्र आहे.  ९४ हजार ३२० जागा सरकारी आयटीआयमध्ये, तर ५३ हजार ११२ जागा खासगी आयटीआयमध्ये उपलब्ध होत्या.

मात्र, १९ जुलै २०२५ पर्यंत झालेल्या केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेंतर्गत  २०२५ मध्ये सरकारी आयटीआयमध्ये सर्व ९४ हजार ३२० जागा कॅपसाठी दिल्या गेल्या.  खासगी आयटीआयमध्ये मात्र केवळ ४० हजार ८५ जागा कॅप अंतर्गत होत्या, उर्वरित १० हजार ७४३ जागा संस्था स्तरावर (इन्स्टिट्यूट लेव्हल) भरल्या जाणार आहेत, तर १ हजार ५६४ जागा अल्पसंख्याक कोट्यांतर्गत आहेत.

असे झाले प्रवेशपहिली फेरी : पहिल्या फेरीत ८२,८३३ जागा वाटप झाल्या. यामध्ये सरकारी आयटीआयमध्ये ६६,६८० आणि खासगी आयटीआयमध्ये १६,१५३ जागा वितरित झाल्या होत्या. मात्र, या फेरीत केवळ ४२,२९५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यापैकी सरकारी संस्थांमध्ये ३१,८२७ विद्यार्थी तर खासगी संस्थांमध्ये १०,४६८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.  दुसरी फेरी : २२ जुलैपर्यंत दुसऱ्या फेरी सुरू असून, १९ जुलैपर्यंत ४९,३४६ जागा वाटप झाल्या. यात ८,२७१ विद्यार्थी प्रवेशासाठी पुढे आले. सरकारी आयटीआयमध्ये ६,४५१ व  खासगीमध्ये १,८२२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, असे व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाने सांगितले.

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेजEducationशिक्षण