UPSC Exam : केंद्रीय लोकसेवा आयोग, म्हणजेच UPSC मार्फत घेतली जाणारी परीक्षा सर्वात कठीण समजली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी परीक्षा देतात, पण मोजकेच उतीर्ण होतात. विविध विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी इंग्रजांच्या काळापासून UPSC परीक्षा घेतली जाते. पूर्वी ICS नावाने ओळखल्या जाणाऱ्या या परीक्षेचे स्वातंत्र्यानंतर UPSC नामकरण झाले. दरम्यान, सोशल मीडियावर 1947 चा UPSC चा पेपर व्हायरल होतोय. हा पेपर पाहून, त्याकाळी परीक्षा कशी घेतली जायची, याचा अंदाज येईल.
1947 मध्ये UPSC चा पेपर कसा होता?सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती 1947 साली घेण्यात आलेला UPSC चा पेपर दाखवतोय. 1947 च्या UPSC च्या पेपरमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती व्यक्ती सांगते की, त्याकाळी परीक्षेत फक्त 15 प्रश्न विचारले जायचे. परीक्षेची काठीण्य पातळीही खूप कमी होती. प्रश्नांमध्ये एखाद्या इंग्रजी शब्दांचे फुल फॉर्म किंवा पुस्तकाच्या लेखकाचे नाव विचारले जायचे.
व्हिडिओ पाहा
X प्लॅटफॉर्मवर @SimplifieDDD नावाच्या अकाउंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे. वृत्त लिहेपर्यंत हा व्हिडिओ 51 हजारांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तर, @IASfraternity नावाच्या युजरने या संपूर्ण प्रश्नपत्रिकेचा फोटो त्याच्या अकाउंटवरून शेअर केला आहे.
व्हायरल फोटो येथे पहा