शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

आता एकाचवेळी घ्या दोन पदव्या; दुहेरी पदवी अभ्यासक्रमासाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 09:43 IST

मुंबई विद्यापीठ आणि डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठ यांच्यात दुहेरी पदवीसाठी शुक्रवारी सामंजस्य करार झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठाने दुहेरी पदवीसाठी राज्यातील चार विद्यापीठांशी करार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मुंबई विद्यापीठ येत्या काही दिवसांत पुण्यातील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाशी करार करणार आहे. त्याचबरोबर एसएनडीटी विद्यापीठ, सोमय्या विद्यापीठ आणि एचएसएनसी विद्यापीठासह अन्य नामांकित महाविद्यालयांबरोबरही दुहेरी पदवी अभ्यासक्रम राबविण्यासाठी मुंबई विद्यापीठाची बोलणी सुरू आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना एकाचवेळी दोन पदव्या घेता येतील.

मुंबई विद्यापीठ आणि डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठ यांच्यात दुहेरी पदवीसाठी शुक्रवारी सामंजस्य करार झाला. त्यातून डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन एकाचवेळी दोन पदव्या घेता येतील. या करारान्वये डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठ हे यजमान विद्यापीठ म्हणून काम पाहणार आहे. तर दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्र हे सहयोगी संस्था म्हणून काम पाहणार आहे. 

करार प्रक्रिया सुरू आता त्याच धर्तीवर अन्य विद्यापीठांबरोबर दुहेरी पदवीसाठी करार करण्याची प्रक्रिया मुंबई विद्यापीठाने सुरू केली आहे. सीओईपी विद्यापीठाशी करार अंतिम टप्प्यात आहे. अन्य विद्यापीठांशी बोलणी सुरू असून लवकरच प्रशासकीय बाबी पूर्ण करून करार केले जाणार आहेत, असे मुंबई विद्यापीठातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

कोणते अभ्यासक्रम? डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणारे विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या सीडीओईमार्फत राबविण्यात येणाऱ्या पदवीच्या बीए. बीकॉम, बीकॉम (अकाउंटिंग अँड फायनान्स), बीएससी (माहिती तंत्रज्ञान, संगणक शास्त्र) या अभ्यासक्रमांना दुहेरी पदवीसाठी प्रविष्ठ होऊ शकतील. पदव्युत्तर शिक्षणासाठी एमए, एम.कॉम (ॲडव्हान्स अकाउंटन्सी, बिझनेस मॅनेजमेंट) एमससी (मॅथेमॅटिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि संगणकशास्त्र) एमएमएस आणि एमसीए अशा अभ्यासक्रमांची दुहेरी पदवी विद्यार्थी घेऊ शकतील, अशी माहिती मुंबई विद्यापीठाने दिली.

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठ