शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CUCET 2022 Notification: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! मार्कांची गरज नाही; प्रवेश परीक्षेवरच कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 11:29 IST

CUCET 2022 Notification by UGC: विद्यापीठात प्रवेशासाठी जास्त टक्के मिळविण्याचा ताण विद्यार्थ्यांवर असायचा, मात्र आता नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) सर्व केंद्रीय विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (CUET) जाहीर केली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. ही परीक्षा १३ भाषांमध्ये होणार असल्याची माहिती यूजीसीने दिली आहे.

दिल्ली विद्यापीठ, जेएनयू आणि जामियासह सर्व केंद्रीय विद्यापीठांना पुढील शैक्षणिक वर्षापासून CUET च्या आधारावर प्रवेश घ्यावा लागेल. ही परीक्षा हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, उर्दू, आसामी, बंगाली, पंजाबी, उडिया आणि इंग्रजी भाषेत घेतली जाईल. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे घेतली जाईल.

अधिक माहिती nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. सीईटी परीक्षेचे अर्ज एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतील. राज्य किंवा खाजगी डीम्ड विद्यापीठे देखील या परीक्षेमध्ये भाग घेऊ शकतात. मोठ्या संख्येने केंद्रीय विद्यापीठांनी CUET 2022 मध्ये त्यांचा सहभाग नोंदविला आहे. त्याची माहिती लवकरच nta.ac.in वर प्रसिद्ध केली जाईल.

 

काय होणार फायदा...विद्यापीठात प्रवेशासाठी जास्त टक्के मिळविण्याचा ताण विद्यार्थ्यांवर असायचा, मात्र आता नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे. आता सर्व केंद्रीय विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बोर्डाच्या परीक्षेत म्हणजेच १२वीमध्ये मिळालेल्या गुणांना कोणतेही महत्त्व दिले जाणार नाही. आता केंद्रीय विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये पदवीपूर्व प्रवेशांसाठी, पात्रता निकषांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर १२वीच्या गुणांचा कोणताही परिणाम होणार नाही. हे नियम शैक्षणिक सत्र २०२२-२३ पासून सुरू होतील.

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाcollegeमहाविद्यालय