शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एमबीबीएसच्या दुसऱ्या फेरीत ‘नो ॲडमिशन’; खासगी महाविद्यालयांचा आक्रमक पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 07:56 IST

खासगी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलकडून राबविली जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीबाबत खासगी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांनी सीईटी सेलने जाहीर केलेल्या दुसऱ्या फेरीतील गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी कॉलेजांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीबाबत  केलेल्या मागणीवर अद्यापही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही. परिणामी एमबीबीएसच्या दुसऱ्या फेरीत खासगी कॉलेजांत जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांवर टांगती तलवार आहे. 

खासगी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलकडून राबविली जाते. या कॉलेजांमध्ये प्रवेश घेणारे ६० ते ७० टक्के विद्यार्थी हे विविध प्रवर्गातून येतात. तसेच यंदापासून मुलींचे १०० टक्के शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ईसीबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक शुल्कात सवलत देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांचे शुल्क प्रवेशावेळी कॉलेजांना घेता येत नाही. सरकारकडूनही विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती कॉलेजांना वेळेवर होत नाही. त्यातून कॉलेजांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे, असे महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांच्या व्यवस्थापनांच्या संघटनेने राज्य सरकारला दिलेल्या निवेदनात म्हटले होते. या प्रश्नाबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत २६ सप्टेंबरला बैठक झाली होती.   शुल्क प्रतिपूर्तीबाबत राज्य सरकारने आदेश जारी केला नसल्याने संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. एमबीबीएसच्या दुसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया कॉलेजस्तरावर थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे एएमयुपीएमडीसीनेने सीईटी सेलच्या आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. याबाबत सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांना विचारले असता ते म्हणाले, की अशा प्रकारचे कोणतेही पत्र अद्याप मिळाले नाही.

संघटनेची भूमिका सरकारकडे यापूर्वीचेच प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाचे ७०-७० कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यात आता ८ लाखापर्यंत कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या मुलींना पूर्ण फी माफी असणार आहे. प्रवेश घेणाऱ्यांत ६५ ते ७० टक्के मुली असतात. प्रवेश दिला आणि आम्हाला पैसे मिळाले नाहीत, तर दैनंदिन खर्च, पगार, वीज बिल भरणे अशक्य होणार आहे. शासनाच्या निर्णयाशी आम्ही सहमत आहोत. पण महाविद्यालयांना पैसे मिळायला हवेत, अशी संघटनेची भूमिका असल्याचे एका पदाधिकाऱ्याने लोकमतला सांगितले.

टॅग्स :doctorडॉक्टर