शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल सुधारणा गुणांकनात मुंबई विद्यापीठ अव्वल; पुणे विद्यापीठ नवव्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 07:02 IST

उच्च व तंत्र शिक्षण विभागाने हे गुणांकन अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील एकूण १३ विद्यापीठांपैकी डिजिटल व प्रशासकीय सुधारणा निकषांमध्ये मुंबई विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने हे गुणांकन अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.

राज्यातील विद्यापीठांमध्ये प्रशासनिक कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान व डिजिटल करण्याच्या उद्देशाने उच्च शिक्षण विभागाने ठरावीक निकष निश्चित केले होते. या निकषांनुसार करण्यात आलेल्या मूल्यमापनात मुंबई विद्यापीठाने ८० गुण मिळवीत राज्यात अव्वल स्थान मिळविले आहे. या मूल्यमापनात कर्मचारी सेवा पुस्तिका डिजिटल करणे, सेवा आदेशांची ऑनलाईन नोंद, पदोन्नती प्रक्रिया सुलभ करणे, सेवा नियमांशी संबंधित माहिती पोर्टलवर अद्ययावत ठेवणे, तसेच या प्रणालींसाठी देण्यात आलेले प्रशिक्षण, आदी बाबींचा समावेश करण्यात आला होता.

गुणांकन यादीत एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई ७७ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीने ६९ गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकाविला आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक ६८ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे, तर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या दोन्ही विद्यापीठांनी ६७ गुण मिळवीत संयुक्तपणे पाचवा क्रमांक मिळविला आहे.

पुणे विद्यापीठ नवव्या क्रमांकावर

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ६५ गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक ही दोन्ही विद्यापीठे सातव्या क्रमांकावर आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आठव्या क्रमांकावर, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नवव्या क्रमांकावर आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai University Tops Digital Ranking; Pune University at Ninth Position

Web Summary : Mumbai University ranks first in digital and administrative reforms among 13 state universities. SNDT and Gondwana follow. Pune University secures ninth position in the ranking based on transparency and digitization.
टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठdigitalडिजिटलtechnologyतंत्रज्ञान