शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

एमबीबीएस प्रवेश; टांगती तलवार कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 10:01 IST

कॉलेजांवर कारवाईसाठी एनएमसी, आरोग्य विद्यापीठाला सीईटी सेलकडून पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकारबरोबर खासगी कॉलेजांची बैठक न झाल्याने एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर दुसऱ्या दिवशीदेखील तोडगा निघाला नाही.  कॉलेज शनिवारीही प्रवेश प्रक्रिया न राबविण्यावर ठाम आहेत. त्यातच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) आणि आरोग्य विद्यापीठाला पत्र लिहून कॉलेजांवर कारवाई करण्यास सांगितले आहे. त्यातून विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर टांगती तलवार कायम आहे.

राज्य सरकारकडून खासगी कॉलेजांमध्ये विविध प्रवर्गांतून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत दिली जाते. सरकार त्याची प्रतिपूर्ती कॉलेजांना करते. मात्र, मागील काही वर्षांचे कॉलेजांचे शुल्क मिळणे बाकी आहे. त्यातून कॉलेजेस आक्रमक झाली.. त्यांनी एमबीबीएसच्या दुसऱ्या फेरीचे प्रवेश न करण्याचा निर्णय घेतला आहे. सीईटी सेलने जाहीर केलेल्या दुसऱ्या फेरीच्या गुणवत्ता यादीतील पालकांना दुसऱ्या दिवशीही प्रवेशाविना माघारी परतावे लागले. 

नागपूर येथील एनकेपी साळवे कॉलेजच्या प्रवेश यादीत मुलीचा क्रमांक आला आहे. प्रवेशासाठी मुंबईहून गुरुवारी कॉलेजमध्ये गेलो. शुक्रवारीही कॉलेजने प्रवेश द्यायला नकार दिला. त्यातून हॉटेलची खोली घेऊन राहावे लागत आहे.     - सुरेंद्र चौधरी, पालक  

सरकारकडे आधीची शिष्यवृत्तीची रक्कम प्रलंबित आहे. पैसे न मिळाल्यास कॉलेजेस पगारही देऊ शकणार नाहीत. सरकारबरोबर शुक्रवारी या प्रश्नावर बैठक झाली नाही. त्यातून प्रवेश प्रक्रिया सुरू न करण्यावर ठाम आहोत.- सदस्य, असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ अनएडेड प्रायव्हेट मेडिकल अँड डेंटल कॉलेजेस

विद्यार्थ्यांच्या तक्रारी आरोग्य विद्यापीठाला पाठविल्या आहेत, तसेच एनएमसी आणि आरोग्य विद्यापीठांना कॉलेजांवर कारवाई करावी, असे पत्र शुक्रवारी लिहिले आहे. प्रवेश प्रक्रिया बाधित होत असून,प्रवेशासाठी पुढील कॉलेज निवडण्यासही अडचणी येत आहेत.  प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देशही सर्व कॉलेजांना दिले आहेत.     - दिलीप सरदेसाई,     आयुक्त, सीईटी सेल 

टॅग्स :doctorडॉक्टर