शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

व्यवस्थापन कोट्यातील नियमबाह्य प्रवेश अमान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2022 05:33 IST

सीईटी सेलचे आदेश : तंत्र शिक्षण संचालनालयाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कॅप प्रवेश फेरी यादी अगोदरच व्यवस्थापन कोट्यातून बेकायदा प्रवेश दिल्यास त्याला नियामक प्राधिकरणाकडून मान्यता मिळणार नाही. त्यामुळे राज्यातील तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) प्रसिद्ध केलेल्या नियमानुसार प्रवेश प्रक्रिया राबवण्याची सूचना तंत्र शिक्षण संचालनालयाचे (डीटीई) संचालक डॉ. अभय वाघ यांनी राज्यातील महाविद्यालयांना दिली आहे.

सीईटी सेलने अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आदी व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यापूर्वीच राज्यातील खासगी महाविद्यालयांनी मनमानी पद्धतीने त्यांच्या व्यवस्थापन कोट्यातील जागा भरल्याची तक्रार सीईटी सेलकडे करण्यात आली. बेकायदा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या प्रवेशांना प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून मान्यता मिळणार नसल्याचे सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. वाघ यांना पत्राद्वारे स्पष्ट केले.  

डीटीईच्या अखत्यारितील महाविद्यालयांना नियमानुसार व्यवस्थापन कोटा प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले. महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थेच्या तरतुदीनुसार व्यवस्थापन, अल्पसंख्याक कोट्यातील जागा आणि केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनंतर रिक्त राहणाऱ्या जागांवर प्रवेश प्रक्रिया करावी. त्याचप्रमाणे सीईटी सेलच्या परिपत्रकातील नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश महाविद्यालयांना दिले आहेत.

प्रवेशाबाबतचे सक्षम प्राधिकारी सीईटी सेल आयुक्त असल्याने प्रवेशासंदर्भात त्यांच्याकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन न करता नियमबाह्य पद्धतीने केलेल्या प्रवेशांना नियामक प्राधिकरणाकडून मान्यता देण्यात येणार नाही, याची शैक्षणिक संस्थांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत नियमबाह्य प्रवेश देऊन शैक्षणिक भ्रष्टाचार होणार नाही, याची संस्थांनी काळजी घ्यावी. - डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय