शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

आयडॉलची चलती, १६ हजारांहून अधिक प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2022 07:43 IST

३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, विद्यार्थ्यांना दिलासा 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त संस्थेच्या जुलै सत्राच्या प्रवेशास ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.  जुलै सत्राचे प्रवेश २५ जूनपासून सुरू झाले असून आजपर्यंत या सत्रात १६ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेतला आहे.  

 पदवीस्तरावरील प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीकॉम अकाउंट्स अँड फायनान्स, बीएस्सी आयटी, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स हे अभ्यासक्रम  व  पदव्युत्तर स्तरावरील प्रथम वर्ष एमए (इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, मराठी, हिंदी, इंग्रजी), एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी, एमएस्सी कॉम्प्युटर सायन्स व पदव्युत्तर पदविका पीजी डीएफएम या अभ्यासक्रमाचे प्रवेश आजपासून सुरू होत असून प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत आहे. हे प्रवेश ऑनलाइन असून, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning/  या संकेतस्थळाला भेट द्यावी.

एमएचे प्रस्तावित तीन नवे अभ्यासक्रम यावर्षी एमए मानसशास्त्र, एमए संज्ञापन व पत्रकारिता आणि  एमए जनसंपर्क हे तीन अभ्यासक्रम मान्यतेसाठी यूजीसीकडे पाठविण्यात आले असून, या अभ्यासक्रमाला यूजीसीची मान्यता मिळाल्यानंतर हे तीन अभ्यासक्रम याच शैक्षणिक वर्षात सुरू केले जातील, असे संस्थेचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी सांगितले. 

बीए मानसशास्त्र विषय सुरू बीएमध्ये मानसशास्त्र विषयाला विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अनेक महाविद्यालयांत तृतीय वर्षी बीएमध्ये मानसशास्त्राचे सहा पेपर उपलब्ध नसल्याने विद्यार्थी मानसशास्त्रापासून वंचित राहतात. यावर्षीपासून आयडॉलमध्ये मानसशास्त्राचे सहा पेपर सुरू करण्यात येत आहे. एआयसीटीईने आयडॉलला एमएमएस-एमबीए व एमसीए या अभ्यासक्रमाला दूरस्थ माध्यमातून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यानुसार एमएमएस-एमबीए व एमसीए या अभ्यासक्रमासाठी आयडॉल लवकरच प्रवेश परीक्षा घेणार आहे. एआयसीटीईने आयडॉलला एमएमएस-एमबीएसाठी ७२० जागा, तर एमसीएसाठी २००० जागांना मान्यता दिली आहे. याला यूजीसीची मान्यता मिळाल्यानंतर त्याची प्रवेश परीक्षा घेण्यात येईल.विभागीय उपकेंद्रावर मार्गदर्शन व अध्ययन साहित्य वितरण आयडॉलचे चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी येथे विभागीय केंद्रे असून याठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण होणार आहे. पालघर येथेही लवकरच विभागीय केंद्र सुरू होणार आहे. 

एमएचे प्रस्ताविततीन नवे अभ्यासक्रम यावर्षी एमए मानसशास्त्र, एमए संज्ञापन व पत्रकारिता आणि  एमए जनसंपर्क हे तीन अभ्यासक्रम मान्यतेसाठी यूजीसीकडे पाठविण्यात आले असून, या अभ्यासक्रमाला यूजीसीची मान्यता मिळाल्यानंतर हे तीन अभ्यासक्रम याच शैक्षणिक वर्षात सुरू केले जातील, असे संस्थेचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी सांगितले.