शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

HSC Result: बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा, राज्य मंडळाचे विद्यार्थी अजूनही पाहताहेत वाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 12:11 IST

HSC Result Update: सीबीएसई मंडळाचा बारावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. मात्र, राज्य मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार, याची राज्य शिक्षण मंडळाकडून अद्याप काहीच स्पष्टता नसल्याने विद्यार्थी, पालक गोंधळले असून ते निकालाची तारीख जाहीर होण्याची वाट पाहत आहेत.

मुंबई : सीबीएसई मंडळाचा बारावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. मात्र, राज्य मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार, याची राज्य शिक्षण मंडळाकडून अद्याप काहीच स्पष्टता नसल्याने विद्यार्थी, पालक गोंधळले असून ते निकालाची तारीख जाहीर होण्याची वाट पाहत आहेत.बारावीनंतरच्या व्यावसायिक आणि पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी सीबीएसई, आयसीएसई आणि राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असते. आता सीबीएसई, आयसीएसई दोन्ही मंडळांकडून निकाल जाहीर झाल्याने राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार देशातील सर्व राज्यांनी बारावीचे निकाल ३१ जुलै २०२१ पूर्वी लावावेत, अशा सूचना होत्या. मात्र, राज्यातील पूरपरिस्थिती लक्षात घेता काही जिल्ह्यांतील कनिष्ठ महाविद्यालये व शाळांना निकालाचे काम पूर्ण करण्यास मंडळाकडून विशेष वेळ देण्यात आला.कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि प्राचार्यांकडून अंतर्गत मूल्यमापन करण्याचे काम नुकतेच पूर्ण होत आहे. त्यानंतर मंडळ स्तरावरही निकालावर कार्यवाही अपेक्षित असल्याने निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची माहिती मंडळातील अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे. 

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालEducation Sectorशिक्षण क्षेत्र