शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना पैशाची किंमत कशी कळेल? त्यासाठी काय करायचं? जाणून घ्या मोलाचे सल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 05:22 IST

एखाद्या गोष्टीपासून मुलांना वंचित ठेवलं, तर त्याचं त्यांना जास्त आकर्षण वाटतं आणि चुकीच्या मार्गानं त्या गोष्टींकडे मुलं वळतात, त्यामुळे पालकांनीच योग्य ती समज देऊन त्यांच्यावरची अनावश्यक बंधनं उठवली, तर साधनांचा योग्य मार्गानं वापर करतात, हे आता सिद्ध झालं आहे.

मुलांना पॉकेट मनी द्यावा का, याबाबत पूर्वी बरेच पालक साशंक असायचे आणि मुलांना नको त्या वयात पैशांची सवय लावू नये, असं त्यांचं मत होतं.. काहीअंशी हे खरं असलं, तरी मुलांना ‘योग्य’ तेवढा पॉकेटमनी द्यायला हवा, असं आता तज्ज्ञांचं मत आहे. एखाद्या गोष्टीपासून मुलांना वंचित ठेवलं, तर त्याचं त्यांना जास्त आकर्षण वाटतं आणि चुकीच्या मार्गानं त्या गोष्टींकडे मुलं वळतात, त्यामुळे पालकांनीच योग्य ती समज देऊन त्यांच्यावरची अनावश्यक बंधनं उठवली, तर साधनांचा योग्य मार्गानं वापर करतात, हे आता सिद्ध झालं आहे. पैशांची गोष्टही त्याला अपवाद नाही. यासंदर्भात काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं?..१) पैशांचं नियोजनमुलांना जर आपल्या मार्गदर्शनाखाली पैशांचा योग्य वापर करायला शिकवलं, पैशासंदर्भात छोटे-छोटे निर्णय त्यांना घेऊ दिले, तर मुलं पैशांचं उत्तम नियोजन करतात आणि पैशांची ‘किंमत’ही त्यांना कळते, असा तज्ज्ञांचा अनुभव आहे. २) कर्जाच्या विळख्यापासून मुक्त मुलांना लहानपणापासून पैशांबाबत ‘आत्मनिर्भर’ बनवलं, पैशांची जबाबदारी घ्यायला शिकवलं, तर मोठेपणी कर्जाच्या विळख्यात सापडण्याची  शक्यता कमी होते. ३) आज, आता... नाही !आज, आता, ताबडतोब... कोणतीही गोष्ट लगेच पाहिजे, असा अनेकांचा कल असतो. आजूबाजूला पाहिल्यावर मुलांनाही अशा गोष्टींची चटक लागू शकते, पण पैशांचा योग्य वापर त्यांना शिकवला, त्यासाठी ‘पैशाची मालकी’ (अर्थातच मर्यादित प्रमाणात) त्यांच्यावर सोपवली, तर ‘आज, आत्ता...’ या हव्यासापासून मुलं स्वत:ला वाचवू शकतात आणि नंतर मिळालेलं म्हणजेच ‘विलंबित समाधान’ किती मोठं असतं, याची जाणीव त्यांना होते. ४) उद्दिष्ट व साध्य याची पूर्तता  कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही, त्यासाठी कष्ट करावे लागतात आणि पैसा कितीही कमी असला, तरी त्याला ‘किंमत’ असते. तसेच योग्य मार्गाने साठवत नेल्यास तो वाढीस लागतो आणि त्याची ‘किंमत’ही वाढते, याची जाणीव मुलांना पॉकेटमनीमुळे होते. आपल्या प्राथमिकता  मुलांना कळतात आणि आपली मध्यम आणि दीर्घकालीन ध्येयंही त्यांना त्यामुळे गाठता येतात.